raju shetty and narake appose to gokul multistate | Sarkarnama

गोकुळच्या मल्टिस्टेट होण्याला राजू शेट्टी, चंद्रदीप नरकेंचाही विरोध 

सुनील पाटील
रविवार, 16 सप्टेंबर 2018

कोल्हापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा असणार गोकुळ दूध संघात इतर राज्यातील सभासद कशासाठी असा सवाल केला जात आहे. गोकुळमध्ये राजकारण करण्याचा प्रश्‍न नाही. गोकुळमध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आहेत. पण, हा संघ कोल्हूापरातीलच शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे. अशी भूमिका खासदार राजू शेट्टी आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडून घेतली जात आहे. 

गोकुळ दूध संघाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात "गोकुळ' मल्टिस्टेट व्हावा किंवा इतर प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी संपर्क सभा घेतल्या. या सर्व सभांमध्ये गोकुळ मल्टिस्टेट करण्यासाठी विरोध झाला. तसेच, करवीर तालुका संर्पक सभेत सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या गटातील आणि राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्‍वास नेजदार यांना मारहाण झाली. 

दरम्यान, गोकुळ मल्टिस्टेट होण्याला सर्वच तालुक्‍यातून वाढता विरोध होत आहे. यापार्श्‍वभूमीवररू शेट्टी आणि नरके यांनीही गोकुळ मल्टिस्टेट होवू नये यासाठी मोर्चे बांधणी केली आहे. नरके आज (रविवार) गोकुळ दूध उत्पादकांचा मेळावा घेवून याला विरोध करणार आहे. तसेच, शेट्टीही याबाबत आपली भूमिका आज स्पष्ट करणार आहेत. 

संबंधित लेख