raju shetty and farmers | Sarkarnama

सर्वच राजकीय लबाडांचे शेतकऱ्यांना फसविण्यासाठी एकमत - राजू शेट्टी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

नांदेड : शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव देतांना यंदा सरकारने दोनशे रुपयाची वाढ केली. परंतु ही दरवाढ नसून, शासनाने नियमाच्या चौकटीत राहुन कॉग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील साखर सम्राटांना वाचविण्यासाठीच शेतकऱ्याना फसवण्यासाठी सरकार आणि राजकीय लबाड पक्षाने एकमत केले असल्याचे आरोप खासदार राजु शेट्टी यांनी ऊस परिषदेत बोलताना केला. 

नांदेड : शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव देतांना यंदा सरकारने दोनशे रुपयाची वाढ केली. परंतु ही दरवाढ नसून, शासनाने नियमाच्या चौकटीत राहुन कॉग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील साखर सम्राटांना वाचविण्यासाठीच शेतकऱ्याना फसवण्यासाठी सरकार आणि राजकीय लबाड पक्षाने एकमत केले असल्याचे आरोप खासदार राजु शेट्टी यांनी ऊस परिषदेत बोलताना केला. 

प्रा. डॉ. प्रकाश पौपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पावडे मंगल कार्यालयात शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, सरकराने शेतकऱ्यांना एका टनामागे 158 रुपयांचा घाटा केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु असून, त्यांना त्यांच्या हक्कचे पैसे मिळवून दिल्याशिवाय शेतकरी संघटना पक्ष शांत बसणार नाही. 

शेट्टी पुढे म्हणाले, " भाषण केल्याने कुठलीही क्रांती होत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटीतपणे लढण्याची गरज आहे. सरकारने कर्जमाफी देतांना सरसकट, तत्वता आणि निकष हे तीन शब्द टाकून शेतकऱ्यांची अडचण केली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. परंतु आता आम्हाला कुणाच्या दयेची, मेहरबानीची आणि भिकेची गरज नाही. राज्यघटनेने दिलेल्या कायद्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहेत. त्यासाठी 30 नोव्हेंबरला संसदेला घेराव घालून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वेगळे अधिवेधन घेण्याची मागणी करण्यात येईल तेव्हा कळेल कोणता पक्ष शेतकऱ्यांच्या बाजुने आणि कोण विरोधात आहे ते.' 

आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेची किमत बघता शेतकऱ्यांच्या साखरेला सुद्धा चांगला दर मिळणे अपेक्षित आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या ऊसाला हमी भाव देत नाही. त्यामुळे यंदा ऊसाची लागवड घटली असून, भविष्यात भारताला दुसऱ्या देशातून साखर आयात करावी लागेल. शेतकऱ्यांना 158 रुपये मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून दिल्याशिवाय शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले. या वेळी माजी मंत्री सुबोध मोहिते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माणिकराव राजेगोरे, प्रल्हाद इंगोले यांची उपस्थिती होती. 

संबंधित लेख