दीक्षितांच्या फॉर्म्युलाने 14 किलो वजन घटले - राजू शेट्टी

 दीक्षितांच्या फॉर्म्युलाने 14 किलो वजन घटले - राजू शेट्टी

पुणे : वजन घटविण्यासाठी मी विशेष काही केले नाही. जगन्नाथ दीक्षित यांना कधी भेटलो नाही. त्यांचे व्याख्यानही कधी ऐकले नाही. मात्र माहितीगार लोकांनी दीक्षित यांच्या सांगितलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे दिवसातून दोनवेळा जेवण व मधल्या काळातील खाणे वर्ज्य केल्याने तीन महिन्यात 14 किलो वजन कमी केल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. 

अनौपचारिक गप्पा मारताना खासदार शेट्टी यांनी आपल्या तब्बेतीचे रहस्य सांगितले. वजन कमी झाल्याने आवाज चांगला झाला. गुडघ्याचा त्रासदेखील कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. मी अवघा पन्नाशीचा असून अजून बराच पल्ला गाठायचा आहे. राजकीय वजन वाढायला हरकत नाही. मात्र शारीरिक वजन कमी केले आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. 

राजकीय नेत्यांची दैनंदिनी कमालीची व्यस्त असते. बऱ्याचदा त्याचा तब्बेतीवर विपरीत परिणाम होतो. या पार्श्‍वभूमीवर खासदार शेट्टी यांची शारिरीक तंदुरूस्ती महत्वपूर्ण आहे. सतत आंदोलन, मोर्चे, बैठका आणि या निमित्ताने होणारा प्रवास हा शेट्टी यांचा दिनक्रम आहे.गेली सलग अनेक वर्षे याच पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शेट्टी यांनी शंभर किलो असलेले वजन 86 किलोवर आणले आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खासदार शेट्टी राज्यभर दौरे करीत असतात. त्यामुळे व्यायाम आणि आहार याची विशेष काळजी घेणे केवळ अशक्‍य असते. यामुळे दीक्षित यांनी सांगितलेला फार्म्युला पाळला तर आरोग्याचे बरेचसे प्रश्‍न निर्माण होत नाहीत, असा अनुभव स्वत: शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितला. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितलेल्या आहार पद्धतीचा अवलंब करणारे " फॉलोअर' राज्यभर वाढत आहेत. ग्रामीण भागातही दीक्षित यांनी सांगितलेल्या आहार पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यात युवकांची संख्या मोठी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com