raju shetty about sugercane rate | Sarkarnama

उसदरावर लवकर तोडगा निघण्याची शक्‍यता नाही : शेट्टी

सदानंद पाटील 
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

द्यापासून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार

कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे शेतकऱ्यांबददल प्रेम असल्याचे दाखवत आहेत. मात्र त्यांचे हे प्रेम म्हणजे मगरीचे आश्रू असल्याचा टोला खा. राजू शेट्टी यांनी लावला. तसेच उसदरावर लवकर तोडगा निघण्याची शक्‍यता नसून उद्यापासून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्‍त केला. 

खासदार शेट्टी म्हणाले, उसदरावर तोडगा सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाणार आहे. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपयाला संमती दिली आहे. त्याप्रमाणे साखर कारखान्यांनी उस उत्पादकाला उचल द्यावी आणि कारखाने खुशाल चालू करावेत. आपली त्याला काही हरकत नाही. मात्र दराचा तोडगा न काढता कारखाने चालू देणार नाही, अशी भूमिका खा. शेट्टी यांनी स्पष्ट केली.  

संबंधित लेख