raju shetty about prakash ambedkar | Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतोय : शेट्टी

संपत मोरे
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

राजू शेट्टी यांचा कल काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने आहे.

पुणे: "काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील अंतर कमी व्हावं यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. चार राज्यातील निवडणुका झाल्यावरच ते निर्णय घेतील आणि तो निर्णय देशाच्या हिताचा असेल,"असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

जेजुरीला धनगर समाजाचा होणाऱ्या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी एका व्यासपीठावर येणार आहेत. राजू शेट्टी यांचा कल काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने आहे तर प्रकाश आंबेडकर हे या पक्षांवर  टिका करत आहेत. या वर्तमान राजकीय घडामोडीत हे दोन नेते जेजुरीत एकत्र येत आहेत.

शेट्टी म्हणाले,"प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस आघाडी यांच्यातील अंतर कमी करण्याचा माझा प्रयत्न आहे. ते कोणताही निर्णय घाईगडबडीने घेणार नाहीत. चार राज्याच्या निवडणुका झाल्यावर ते निर्णय घेतील आणि तो निर्णय सगळ्यांच्या हिताचा असेल. त्यांचा एमआयएम सोबत मेळावा झाला असला तरी ते आघाडीसोबत येतील, मला खात्री आहे. मी त्यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे." 

संबंधित लेख