raju shetty about prakash aambedkar's vande matram stand | Sarkarnama

'वंदे मातरम' हे देशभक्तीपर गीत; आंबेडकर अनावश्यक वाद कां उपस्थित करताहेत?

संपत मोरे
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत आणण्यासाठी राजू शेट्टी प्रयत्नशील आहेत.

पुणे : 'वंदे मातरम' हे देशभक्तीपर गीत आहे, त्यातून देशप्रेम व्यक्त होते. त्यामुळे 'वंदे मातरम'ला विरोध करणे हे प्रकाश आंबेडकर यांचे व्यक्तिगत मत आहे. हे अनावश्यक वाद आहेत, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

प्रकाश आंबेडकर यांनी काल 'वंदे मातरम'ला आमचा विरोध आहे, असे विधान केले होते.

त्यावर शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. 'वंदे मातरम' असेल किंवा 'विश्व विजयी तिरंगा प्यारा' ही देशभक्ती व्यक्त करणारी गीते आहेत. त्यातून देशाबद्दल प्रेमच व्यक्त होते. या गीतांना विरोध असण्याचे कारण नाही. मुळात हे सगळे अनावश्यक वाद आहेत. असल्या वादापेक्षा सामान्य कष्टकरी, कामगार शेतकऱ्यांच्या हितासाठी सगळ्या समविचारी राजकीय शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांचा वंदे मातरमला असलेला विरोध असणं हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. या अनावश्यक वादावर चर्चा करण्याची गरज नाही, असे शेट्टी म्हणाले.

संबंधित लेख