raju shetty about frp in satara | Sarkarnama

घेराव घालून सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करु : शेट्टी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

किसन वीर कारखान्यासह राज्यातील पाच साखर कारखान्यांच्या जप्ती आदेशाला सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती आठ दिवसांत मागे घ्यावी, अन्यथा सहकार मंत्र्यांना घेराव घालून थकित एफआरपीचे पैसे वसुल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. 

सातारा : किसन वीर कारखान्यासह राज्यातील पाच साखर कारखान्यांच्या जप्ती आदेशाला सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती आठ दिवसांत मागे घ्यावी, अन्यथा सहकार मंत्र्यांना घेराव घालून थकित एफआरपीचे पैसे वसुल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. 

ज्या साखर कारखान्यांनी थकित एफआरपीची रक्कम दिली नाही, अशा राज्यातील सहा कारखान्यांवर साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीचे आदेश काढले. त्याला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना आजपर्यंत थकित एफआरपी मिळू शकलेली नाही. एकुण 343 कोटींची थकबाकी असून 186 कोटी एकट्या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची आहे. त्यापैकी दहा कोटी सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्यांची आहे. त्यामुळेच त्यांनी कारखान्यांवरील कारवाई बाबत धरसोडीचे धोरण अवलंबले आहे. सहकारमंत्र्यांनी येत्या आठ दिवसांत किसन वीरसह पाच कारखान्यांच्या जप्तीवरील स्थगिती उठविली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी सहकार मंत्र्यांना घेराव घालून पैसे वसुल करू, असा इशारा त्यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख