raju shetty | Sarkarnama

होय मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटलो ! - राजू शेट्टी

ब्रह्मा चट्टे
सोमवार, 24 जुलै 2017

मुंबई : मुख्यमंत्री अस्पृश्‍य आहेत का ? दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटलो म्हणजे वाटाघाटी केल्या असा अर्थ होत नाही. मतदार संघातील कामासंबंधी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून त्यांना भेटलो असे सांगत स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बाजू सावरली. काही दिवसांपुर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटलात का ?, या बैठकीत काय घडले या प्रश्नांचे उत्तर देताना राजू शेट्टी यांनी खुलासा केला आहे. 

खासदार शेट्टी सरकारनामाशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्र्यांची किंवा मंत्र्यांची भेट घेवू नये असं काही नाही. वेगवेगळ्या मंत्र्यांचे व नेत्यांच्या भेटीगाठी होतच असतात. मुख्यमंत्र्यांबरोबर भेटलो याचा अर्थ वाटाघाटी केल्या असे होत नाहीत. मुख्यमंत्र्यांबरोबर मी अनेकांना भेटतं असतो. त्याची का चर्चा होत नाही, मुख्यमंत्र्याशी मतदार संघातील कामानिमीत्त मुख्यमंत्र्यांना भेटायचं नाही का ? मुख्यमंत्री काय अस्पृश्‍य आहेत का ? भेटलो नाहीच तरच माणूस मताशी ठाम आहे असा अर्थ काढायचा असतो का ? ज्याला मॅनेज व्हायचे आहे, ज्याला चळवळीशी गद्दारी करायची आहे. त्याला भेटीगाठी करायची गरजच काय आहे. अशी माणसं फोनवरसुध्दा मॅंनेज होत असतात. असून वेगळ्या पध्दतीने मध्यस्थांच्या मार्फत मॅनेज होत असतात, त्यामुळे या चर्चांना या गाव गप्पांना काहीच अर्थ नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. 
 
संबंधित लेख