raju shetty | Sarkarnama

"स्वाभिमानी' घेणार  भाजपशी "काडीमोड' ? 

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 29 मे 2017

मुंबई : शेतकऱ्यांच्या अच्छे दिनची प्रतीक्षा करत तीन वर्ष "एनडीए'ध्ये सहभागी असलेला खा. राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष अंतिमता सत्तेवर पाणी सोडणार आहे. शेट्टी हे उद्या(मंगळवारी) राज्यपालांच्या भेटीनंतर राज्य सरकारमधून बाहेर पडल्याची घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी स्वाभिमानीच्या महत्वाच्या शिलेदारांसह आज रात्री उशीरा याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही समजते. 

स्वाभिमानचे नेते राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत याच्यात सरळ फुट पडली आहे. स्वाभिमानीने सरकारमधून बाहेर पडावे यासाठी शेट्टी यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. पुण्यातील महात्मा फुले वाडा येथून सुरवात झालेल्या आत्मक्‍लेश यात्रेचा राजभवनवर शेवट होत आहे. शेवटच्या दिवशी सरकारमधून बाहेर पडण्यासाठी पक्षांच्या कार्यकर्ते शेट्टी यांच्याकडे मनधरणी करीत आहे. तर कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय घेण्याची मागणी काही जाणत्या शिलेदारांनी खासदारांकडे धरली असल्याचे समजते. त्यामुळे शेट्टी मंगळवारी घोषणा करणार असल्याचे समजते. 

राज्यातील शेतकऱ्यांना भाजपला मतदान करायला लावल्याचा पश्‍चाताप होत असून त्यामुळेच आपण आत्मक्‍लेश यात्रा काडली असल्याचे स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. आत्मक्‍लेश यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच शेट्टी यांनी मोदी सरकार व फडणवीस सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. या यात्रेत सरकारविरोधी प्रचाराची धार चांगलीच चढवत शेट्टी यांनी आपल्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्यातील "वजनदार" नेते हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचे बळ आत्मक्‍लेश यात्रेला देण्यात आले आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे कोल्हापूरातील नेते संजय मंडलिकांचे कार्यकर्तेही आर्थिक रसदीसह आज आत्मक्‍लेश यात्रेत सहभागी झाले होते. स्वाभिमानीला मिळणाऱ्या राजकीय ताकदीमुळे शेवटी मंगळवारी भाजपबरोबर काडीमोड करण्याची घोषणा शेट्टी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.  

संबंधित लेख