raju shetty | Sarkarnama

राजू शेट्टींचा मुलगा सौरभला  आत्मक्‍लेश यात्रेदरम्यान भोवळ 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मे 2017

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आत्मक्‍लेश यात्रेदरम्यान शेट्टी यांचा मुलगा सौरभ याला भोवळ आली. वडिलांबरोबर तो ही या यात्रेत सहभागी झाला आहे. 

आत्मक्‍लेश यात्रा आज मुंबईत पोचली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सौरभ आपल्या वडिलांबरोबर पायी चालतो आहे. आज आत्मक्‍लेश यात्रा फाईव्ह गार्डनच्या परिसरात असताना सौरभला अचानकपणे भोवळ आली. यावेळी डॉक्‍टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार केले. त्याची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

ही यात्रा सकाळी चेंबूरहून दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाली. या यात्रेमुळे पनवेल-सायन मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यापूर्वी आत्मक्‍लेश यात्रा सुरू असताना वाशी येथे राजू शेट्टी यांना रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना सलाईन लावावे लागले होते. सुमारे एक तासाच्या विश्रांतीनंतर राजू शेट्टींनी पुन्हा आपल्या यात्रेस सुरूवात केली. कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळेत आपण यात्रा पूर्ण करणार असून राज्यपालांना भेटून राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी भरून दिलेले कर्जमुक्तीचे अर्ज त्यांना देणार असल्याचा निश्‍चय त्यांनी बोलून दाखवला होता. 

संबंधित लेख