raju latkar kolhapur politics | Sarkarnama

हसन मुश्रीफांनी राजू लाटकरांना दाखवला कात्रजचा घाट   

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 डिसेंबर 2018

कोल्हापूरः महापालिकेतील शह काटशहाच्या राजकारणात राजू लाटकर यांना आमदार हसन मुश्रीफ यांनी अखेर कात्रजचा घाट दाखविल्याचे स्पष्ट झाले असे असले तरी नदकुमार मोरे यांच्या पत्नी सरिता मोरे यांना महापौर पदी संधी द्यावी यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक आग्रही होते. त्याची दखल घेत मुश्रीफ यांनी मोरे यांनी संधी देण्याचा प्रयत्न केला. पुढील सहा महिन्यात लाटकर यांच्या पत्नी ऍड. सूरमंजिरी लाटकर यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

नेत्यांच्या अधिक जवळ गेल्यानंतर त्याचे काही दुष्परिणामही होतात याचा अनुभव लाटकर यांनी यावेळी घेतला. नेते त्यांच्या सोयीनुसार निष्ठावंताला भुमिका घ्यावयास लावतात. त्याची झळ आपल्याचा राजकारणाला बसते याची प्रचिती या निमित्ताने आली.

मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत लाटकर यांनी उघडपणे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात भुमिका घेतली. लोकसभेसाठी महाडिक हे उमेदवार नको असे लाटकर यांनी सांगितले. त्यांच्यासोबत आर,. के. पोवारही होते. मोठ्यांच्या भांडणात लहांनानी पडायचे नसते असे म्हंटले जाते. लाटकर कारण नसताना या प्रक्रियेत ओढले गेले. पूवी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, स्थायी समिती सभापती अशी पदे दिली असताना त्यांना आणखी किती पदे देणार अशी तक्रार राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मुश्रीफ यांच्याकडे केली. 

नंदकुमार मोरे हे काही मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाहीत. ऑक्‍टोबर 2015 च्या निवडणुकीत शिपगुडे तालीम या प्रभागातून त्यांच्या पत्नी सरिता मोरे या अवघ्या पाच मतांनी विजयी झाल्या. निवडून आल्यानंतर पत्नीला महापौर केले नाही तर आयुष्यात निवडणूक लढविणार नाही अशी भुमिका मोरे यांनी घेतली होती. आमदार हसन मुश्रीफ यांनी सत्ता आल्यास महापौर पदाची संधी देऊ असा शब्द दिला होता. तो शब्द मुश्रीफ यांनी उमेदवारीच्या रूपाने खरा केला. मोरे यांची अद्याप महापौर पदी निवड झालेली नाही. विरोधक काहीही चमत्कार करू शकतता. किमान उमेदवारीच्या रुपाने तरी सध्या मोरे यांचे स्वप्न पूर्ण झाले, असे म्हणावयास काही हरकत नाही.

संबंधित लेख