"एसएसबी'चे हेरखाते  उद्यापासून कार्यरत 

"एसएसबी'चे हेरखाते  उद्यापासून कार्यरत 

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा बलाला (एसएसबी) प्रथमच गुप्तचर विभाग मिळणार असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत या विभागाची कार्यवाही उद्यापासून (ता. 18) सुरू होणार आहे. निमलष्करी दल असलेल्या "एसएसबी'कडे नेपाळ आणि भूतानशी संलग्न असलेल्या भारतीय सीमांच्या रक्षणाची जबाबदारी आहे. 

नव्या गुप्तचर विभागामुळे "एसएसबी'ला नवी ताकद मिळणार असल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. या विभागामध्ये एकूण 650 कर्मचारी असतील. पाकिस्तानमध्ये जाऊन पुन्हा भारतात येण्यासाठी काश्‍मीरमधील अनेक दहशतवादी नेपाळ आणि भूतानमार्गे भारतात येतात. त्यामुळे या सीमांच्या सुरक्षेसाठी जवानांकडे अद्यायावत माहिती असणे आवश्‍यक आहे. नेपाळ आणि भूतानबाबत भारताचे व्हिसामुक्त दळणवळणाचे धोरण असल्याने याचा गैरफायदा घेत अनेक गुन्हेगार आणि देशविरोधी घटक सीमापार करतात. अशा गुन्हेगारांमुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com