rajnatha singh | Sarkarnama

हुतात्मा जवानांच्या  नातेवाइकांना 1 कोटी  .. 

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

नथुला (सिक्कीम) : प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारकडून दिली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केली.

 सरकारने देशभरातील 34 हजार कॉन्स्टेबलच्या जागांचा दर्जा वाढत तो हेडकॉन्स्टेबल असा केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते भारत तिबेट सीमा पोलिसांच्या सैनिक संमेलनामध्ये बोलत होते. निमलष्करी दलातील जवानांच्या बलिदानाचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सध्या देशाच्या मध्य आणि पूर्व भागामध्ये निमलष्करी दलांचा नक्षलवाद्यांशी संघर्ष सुरू असून जम्मू आणि काश्‍मीरमध्ये देशाच्या सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली आहे. आमच्या जवानांचे बलिदान हे पैशातून भरून निघणारे नाही, पण त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, याची दक्षता आम्ही घेऊ, असेही त्यांनी नमूद केले.

संबंधित लेख