rajnath singh | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

केवळ "होयबा' होऊ नका ः राजनाथसिंह

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नवी दिल्ली : चुकीचे आदेश दिल्यावर केवळ "होयबा' म्हणून मान न हलविता त्याबाबत योग्य भूमिका घ्यावी, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. सरकारी कर्मचाऱ्यांनी कायम तटस्थ राहावे आणि निर्णय घेण्यात संकोच बाळगू नये, असे आवाहन त्यांनी गुरुवारी केले. 

नवी दिल्ली : चुकीचे आदेश दिल्यावर केवळ "होयबा' म्हणून मान न हलविता त्याबाबत योग्य भूमिका घ्यावी, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. सरकारी कर्मचाऱ्यांनी कायम तटस्थ राहावे आणि निर्णय घेण्यात संकोच बाळगू नये, असे आवाहन त्यांनी गुरुवारी केले. 

लोकसेवा दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी राजनाथसिंह बोलत होते. "आयएसआय' दर्जाचे व अन्य सरकारी सेवेतील अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. ""राजकीय अधिकाऱ्यांनी चुकीचे आदेश दिले तर त्यांना नियम दाखविण्यास कचरू नये. तुम्ही कायद्याने चुकीचे आहात हे त्यांना ठामपणे सांगा. " हॉं में हॉं ना मिलाएँ', असे सांगून चुकीच्या फायलींवर सह्या करू नका. तुमच्या सद्‌सद्विवेकबुद्धीचा विश्‍वासघात करू नका,'' असे आवाहन त्यांनी केले. 

""समाजात बदल घडवून आणण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट करताना राजनाथसिंह म्हणाले, ""काम हे अधिकाऱ्यांना जबाबदारी, कर्तव्य व निःपक्षपातीपणाचे भान देते. प्रशासकीय सेवेत सत्ता आहे; पण या सत्तेमुळे मोठी जबाबदारी खांद्यावर येते हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावे. तुमच्याकडे तटस्थपणा नसेल तर तुमच्या निर्णयक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.'' जे अधिकारी निर्णय घेणे टाळतात त्यांच्याविषयी बोलताना ""अशी मनोवस्था देशाच्या हिताला मारक असते,'' अशी टिप्पणी त्यांनी केली. गरज वाटत असेल तर तुमच्या वरिष्ठांशी चर्चा करा, मते मांडा; पण निर्णय घेण्यात कमी पडू नका, असा सल्ला गृहमंत्र्यांनी दिला. 

संबंधित लेख