rajiv satav meet nitin gadkari | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

राहूल गांधींचे "खास' राजीव सातव गडकरी वाड्यावर! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

कायम सत्तेत राहण्याची महत्त्वाकांक्षी असलेले अनेक कॉंग्रेस नेते भाजपच्या संपर्कात असून दररोज यावर राजकीय धुराळा उडत आहे. त्यामुळे आज कॉंग्रेसचे हिंगोलीतील खासदार राजीव सातव यांनी केंद्रिय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या घरी त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहे. या भेटीबाबत कॉंग्रेस नेत्यांतही दिवसभर उत्सुकता दिसून आली. 

नागपूर : कायम सत्तेत राहण्याची महत्त्वाकांक्षी असलेले अनेक कॉंग्रेस नेते भाजपच्या संपर्कात असून दररोज यावर राजकीय धुराळा उडत आहे. त्यामुळे आज कॉंग्रेसचे हिंगोलीतील खासदार राजीव सातव यांनी केंद्रिय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या घरी त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहे. या भेटीबाबत कॉंग्रेस नेत्यांतही दिवसभर उत्सुकता दिसून आली. 

खासदार सातव हे शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास केंद्रियमंत्री गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी पोहोचले. गडकरी दीड वाजताच्या सुमारास आपल्या निवासस्थानी आले. गडकरी शहरातील कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे सातव यांना अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. त्यांच्यात सुमारे अर्धा तास बंदद्वार चर्चा झाली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. खासदार सातव हे कॉंग्रेसच्या युवा आघाडीतील प्रमुख मोहरे असून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नजीकचे आहेत. 

दरम्यान, या भेटीबाबत केंद्रियमंत्री गडकरी यांना विचारले असता त्यांनी ही भेट राजकीय नव्हती. मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी सातव आले होते, असे स्पष्ट केले. दुसरीकडे सातव यांनीही विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी गडकरींची भेट घेतल्याचे सांगितले. हिगोली मतदार संघाततील राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित मुद्या संदर्भात ही भेट घेण्यात आली. कळमनुरी तालुक्‍यातील वारंगा फाटा येथील बायपासचा सर्वे या अगोदर नागपूर ते तुळजापूर या महामागार्साठी झाला. तेथील शेतकऱ्यांची जमीन संपादीत केली. आता समृद्धी महामागार्साठी पुन्हा दुसऱ्या बाजूने बायपास करण्यासाठी शेती संपादीत केली जात असून शेतकऱ्यांनी विरोध केला आहे, ही बाब गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी भेट घेतल्याचे सातव म्हणाले. 

संबंधित लेख