राजीव सातव यांना हिंगोलीतच हादरा

राजीव सातव यांना हिंगोलीतच हादरा

हिंगोली : हिंगोली नगरपालिकाच्या निवडणुकामध्ये भाजपाच्या नेत्यांनी हिंगोलीची जागा राखण्यासाटी ओढाताण केल्यानंतर शिवसेनेच्या आजी माजी आमदारांनी स्वतःच्या ताकदीवर विरोधकांना अंधारात ठेवत वसमत व कळमनुरीच्या जागा पटकावल्या. या प्रकारामुळे खासदार . राजीव सातव व कॉंग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे यांना मात्र चांगलाच हादरा बसला आहे. 


जिल्ह्यात नगराध्यक्षपदाच्या निवडणुका हा सर्वच राजकीय नेत्यासाठी प्रतिष्ठेचा विषय होता. राज्यातील भाजपच्या सरकारच्या विरोधात जनमताचा कौल मिळतोय का यासाठी विरोधक अधीर झाले होते. हिंगोलीत पूर्वीपासून सत्तेत असलेली राष्ट्रवादीची टीम मात्र शांतपणे तयारी करीत होती. खंदे व अनुभवी नगरसेवकांची संच असल्याने राष्ट्रवादीने शांतपणे होमवर्क चालले होते. माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी हिंगोलीचा राज्यात गाजलेला मराठा मूक क्रांती मोर्चा व इतर काही गोष्टीमुळे उपनगराध्यक्ष जगजीत खुराणा यांना नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे संधी दिली. भाजपचे बाबाराव बांगर हे मुंडे घराण्याशी एकनिष्ठ असल्याने व त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सोडून निवडणूक लढवली. अर्थात भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे व पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी चांगलीच साथ देवून त्यांना विजयी केले. कॉंग्रेसचे खासदार ऍड. राजीव सातव यांनी नेहमीप्रमाणे पक्षातील मराठा नेते तथा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या विरोधात मोहीम सुरु केल्याने शहराची टीम बिघडली ती शेवटपर्यत सावरलीच नाही. 


नगराध्यक्षपदाच्या राजकारणात तीन पिढ्यापासून अत्यंत यशस्वी समजले जाणारे सराफ घराण्यातील माजी नगराध्यक्ष सुधीर सराफ यांनी या वादात अलिप्त राहणे पसंत केले. मात्र सराफ यांच्या वाढदिवशी नेमक्‍या विरोधकांनी दिलेल्या जाहीर शुभेच्छामुळे कॉंग्रेसजन जागे झाले पण वेळ निघून गेलेली होती. या प्रकाराने भाजपाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. 


वसमतमध्ये माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी सामान्य कार्यकर्ता श्रीनिवास पोरजवार यांना उभे करून त्यांच्या स्वतःच्या स्टाईलने छुपा प्रचार केला व दुसरीकडे सपाच्या उमेदवाराला जोरात चालवून कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मत विभाजनाला चालना देत विजय सोपा केला. कळमनुरीत सेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांनी सत्ताधारी कॉंग्रेसच्या तिकिट वाटपातील भांडणाचा व्यवस्थित फायदा घेत नगराध्यक्षपदी उत्तमराव शिंदे यांना निवडून आणले आणि सभागृहातही बहुमत मिळवले. सातव व डॉ. टारफे यांना राजकीय धक्‍क्‍याला सामोरे जावे लागले. 
विशेष म्हणजे सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधाकर भोईर हिंगोलीकडे फिरकले नाहीत. केवळ सहसंपर्कप्रमुख डॉ.पंडीतराव शिंदे यांनी निवडणुकीकडे लक्ष दिले. मात्र डॉ. मुंदडा व घुगे यांनी दोन सत्ता केंद्रे सेनेसाठी मिळवून आणली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com