rajiv gandhi killers release not demond banvarilal purohit | Sarkarnama

राजीव गांधी हत्येतील मारेकऱ्यांच्या मुक्ततेची शिफारस केली नाहीः पुरोहित 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

चेन्नईः दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सर्व सात मारेकऱ्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यासाठी तमिळनाडू सरकारने केलेली शिफारस केंद्राकडे पाठविली नसल्याचा खुलासा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शनिवारी केला.
 
राजीव गांधी यांच्या मारेकरी जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्यांना तुरुंगातून मुक्त करण्याची तमिळनाडूच्या मंत्रिमंडळाने केलेली राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी विनाकारण केंद्र सरकारकडे पाठविली असल्याचा दावा काही तमीळ संघटनांनी केला आहे. 

काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या हे वृत्त पुरोहित यांनी आज फेटाळून लावले. याबाबत घटनेतील तरतुदींचा आधार घेत निष्पक्ष पद्धतीने योग्य निर्णय घेण्यात येईल असे राज्यपालांनी स्पष्ट केले. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. हे प्रकरण गुंतागुंतीचे असून यातील कायदेशीर, प्रशासकीय व घटनात्मक मुद्दे तपासावे लागतील, असे राजभवनमधील जनसंपर्क विभागाच्या सहसंचालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  

संबंधित लेख