rajiv gandhi assasioner must be release, stalin | Sarkarnama

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडायला हवे, स्टॅलिन यांची सरकारकडे मागणी

वृत्तसंस्था
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या ए. जी. पेरारीवलन याच्यासह दोषींची सुटका करण्याबाबत राज्यपालांकडे शिफारस करावी, अशी मागणी आज द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी तमिळनाडू सरकारकडे केली आहे. 

तमिळनाडू सरकारने कॅबिनेट बैठकीत सुटकेसंदर्भात प्रस्ताव मंजूर करावा आणि हत्ये प्रकरणातील दोषींची मुक्तता करण्याबाबत राज्यपालांना प्रस्ताव द्यावा, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. दोषीत मुरुगन, संथन, पेरारीवलन, नलीनी, रॉबर्ट पायस, रविचंद्रन आणि जयकुमार यांचा समावेश आहे. 

गेल्या 27 वर्षांपासून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. कलम 161 नुसार राज्य सरकार अधिकाराचा वापर करत राज्यपालांकडे दोषींची सुटका करण्याच्या मागणीचा प्रस्ताव मांडू शकतो, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.  

संबंधित लेख