Rajesh Patil denied bail in Ashwini Bindre murder case | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

अश्‍विनी बिंद्रे हत्या प्रकरणी राजेश पाटीलचा जामीन फेटाळला

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे हत्या प्रकरणातील आरोपी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्या अडचणी वाढल्या आहेत.

अलिबाग :   सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे हत्या प्रकरणातील आरोपी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याने जामिनासाठी अलिबाग जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पाटील आता मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्याची शक्‍यता आहे.

अश्‍विनी बिंद्रेच्या हत्या प्रकरणातील आरोपी राजेश पाटील याने पनवेल तालुका न्यायालयात 20 दिवसांपूर्वी जामिनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा सत्र न्यायाधीश बी. सी. कांबळे यांच्या न्यायालयात यावर सुनावणी झाली.

ज्या दिवशी बिंद्रे यांची हत्या झाली त्या दिवशी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये राजेश पाटील हा मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह हजर होता. बिंद्रे यांची हत्या करून मृतदेहाची तुकडे भरलेली पेटी भाईंदरच्या खाडीत टाकण्यातही त्याचा सहभाग होता, असे तपासात उघड झाले आहे.

मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. 10 डिसेंबरला त्यांना बेळगाव येथून पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले होते. पाटीलवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित लेख