Rajesh Narvekar is new collector Of Thane | Sarkarnama

मुख्यमंत्री कार्यालयाचे बलस्थान राजेश नार्वेकर झाले ठाण्याचे जिल्हाधिकारी

सरकारनामा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मितभाषी , कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी राजेश नार्वेकर मुख्यमंत्री कार्यालयाचा कणा होते. त्यांची आज ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. 

मुंबई:  मितभाषी , कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी राजेश नार्वेकर मुख्यमंत्री कार्यालयाचा कणा होते. त्यांची आज ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. 

नार्वेकर अत्यंत शांतपणे मुख्यमंत्री कार्यालयातील कामाचा निपटारा करत असत. प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी ओके करताच तो निर्णय राबवण्याचे काम नार्वेकर करीत.

आयएएस पदावर उन्नत झाल्यानंतर त्यांना काही काळासाठी तरी फिल्ड पोस्टींग करावे लागेल असे वाटत असे.आज प्रत्यक्षात तसे घडले. विवेक भिमनवार , कैलास शिंदे , मिलिंद बोरीकर असे मुख्यमंत्री कार्यालयातील एकेक अधिकारी आयएएस श्रेणीत पोहोचल्यावर बाहेर गेले. आज त्या मालिकेत नार्वेकर यांची भर पडली.

संबंधित लेख