डाॅ. विखे यांचे अतिक्रमण रोखण्यासाठी अॅड. ढाकणे यांच्यामागे मी उभा : राजेंद्र फाळके

तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी राजेंद्र फाळके यांनी जाहीर भाषणातुन अॅड. प्रताप ढाकणे यांचे कौतुक केले. या वेळी फाळके यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर टीका करीत जिल्हा विभाजन करण्याचे आश्वासन कुठे गेले, असा सवाल केला.
Pratap Dhakne - Rajendra Phalke - Sujay Vikhe
Pratap Dhakne - Rajendra Phalke - Sujay Vikhe

पाथर्डी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दक्षिणेची राष्ट्रवादीची जागा उत्तरेतील कोणालाही दिली जाणार नाही. डॉ. सुजय विखे यांचे अतिक्रमण रोखण्यासाठी अॅड. प्रताप ढाकणे यांच्या पाठीमागे मी जिल्हाध्यक्ष म्हणून उभा राहीन, असे जाहीर बोलून ढाकणे यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी राजेंद्र फाळके यांनी  जाहीर भाषणातुन अॅड. प्रताप ढाकणे यांचे कौतुक केले. या वेळी फाळके यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर टीका करीत जिल्हा विभाजन करण्याचे आश्वासन कुठे गेले, असा सवाल केला. ''नगरचे जिल्हा विभाजन केले, तर दक्षिणेचा विकास होईल. उत्तरेचे होणारे डॉ. सुजय विखे यांचे अतिक्रमण रोखावे लागेल. मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे. विखे यांना जागा सोडण्याला माझा विरोध आहे. राष्ट्रवादीच ही जागा लढवेल आणि अॅड. प्रताप ढाकणेंना ते जमेल. मी ढाकणे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहीन,'' असे फाळके म्हणाले. त्यामुळे ढाकणे समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

ढाकणे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे पक्ष श्रेष्ठींना उघडपणे बोलून दाखविले आहे. माजी केंद्रीयमंत्री बबन ढाकणे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. ढाकणे यांनी पवार यांना साकडे घातले, तर हे उमेदवारीच गणित जुळेल, असा दावा ढाकणे समर्थक करीत आहेत. फाळके यांच्या पाठिंब्याने ढाकणे यांना पुन्हा चैतन्य मिळाले आहे. ढाकणे लोकसभेची तयारी करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com