भाजपचे आमदार राजेंद्र पाटणींसमोर पेच; कारंज्याचा तिढा युती कसा सोडवणार?

पाच वर्ष भाजप शिवसेनेत कलगीतुरा रंगल्यानंतर लोकसभा निवडणुकीत युध्दविराम झाला. आता विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. मात्र हा युतीधर्म पाळताना वाशीम जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या कारंजा विधानसभा मतदारसंघावरच युतीधर्माचे गंडातर येण्याची शक्यता आहे.
भाजपचे आमदार राजेंद्र पाटणींसमोर पेच; कारंज्याचा तिढा युती कसा सोडवणार?

वाशीम :  पाच वर्ष भाजप शिवसेनेत कलगीतुरा रंगल्यानंतर लोकसभा निवडणुकीत युध्दविराम झाला. आता विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. मात्र हा युतीधर्म पाळताना वाशीम जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या कारंजा विधानसभा मतदारसंघावरच युतीधर्माचे गंडातर येण्याची शक्यता आहे. 

वाशीम जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या तीन जागा आहेत. वाशीम, कारंजा व रिसोड विधानसभा मतदारसंघाची वाटणी जुन्या युतीधर्माच्या फार्मुल्यानुसार असली तर कारंजा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटणीवर आहे. जिल्ह्यातील वाशीम विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. लखन मलिक येथून प्रतिनिधीत्व करतात. रिसोड विधानसभा मतदारसंघ सध्याल कॉंग्रेसच्या ताब्यात असला तरी माजी आमदार विजय जाधव यांनी या मतदारसंघातू दोन वेळा विजय मिळवून कॉंग्रेसच्या गडाला सर केले होते. त्यामुळे या मतदारसंघावरील विजय जाधव यांचा नैसर्गिक दावा पक्षही अमान्य करू शकनार नाही. परिणामी शिवसेनेला कारंजा विधानसभा मतदारसंघ दिल्याशिवाय भाजपकडे दुसरा पर्याय नाही. आणि राजेंद्र पाटणी यांना जिल्ह्यात दुसरा मतदारसंघ नाही. हा तिढा युतीधर्माच्या कसोटीचा ठरणार आहे.  

शिवसेनाही या मतदारसंघावरील दावा सोडण्यास तयार नाही. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार प्रकाश डहाके यांना शिवसेनेत आणून मातोश्रीवर त्यांना शिवबंधन बांधले. शिवसेनेची उमेदवारी याच अटीवर डहाके यांनी शरद पवारांची घड्याळ सोडून शिवबंधन बांधले तसेच गेल्या तीन वर्षांपासून ते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. या परिस्थितीत शिवसेना वा खासदार भावना गवळी या मतदारसंघावरील दावा सोडण्यास तयार होणार नाहीत. 

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून खासदार भावना गवळी यांना मिळालेले मताधिक्य प्रकाश डहाके यांची जमेची बाजू ठरणार आहे. विजयी जागेचे सुत्रही वाशीम जिल्ह्यात कुचकामी ठरणार असून फिप्टी-फिप्टी फार्मूल्यानुसार शिवसेनेला विदर्भातील कोणत्या जागा सोडणार व कोणत्या लढविणार हा मोठा पेच भाजपसमोर उभा राहणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com