Rajendra nimbalakr warns stylish leaders | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

फुटकळ कामांवर लाखोंची उधळपट्‌टी करणाऱया `चमकोंना` राजेंद्र निंबाळकरांचा इशारा

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे : गल्लीबोळ सजविल्याने शहराचा विकास होत नाही. शहरवासियांच्या नेमक्‍या गरजा ओळखून कामे अपेक्षित असतात, असे सांगतानाच पुण्यात प्रभागनिहाय निधीची उधळपट्टी होऊ देणार नसल्याचे महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना गुरुवारी जाहीर केले.

त्यामुळे प्रभागांमधील फुटकळ कामांवर लाखो रुपयांची उधळपट्‌टी करीत चमकोगिरी करणाऱ्या नगरसेवकांना निंबाळकर यांनी यानिमित्ताने इशारा दिल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या अर्थसंकल्पा नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या दिवसापासून अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार निंबाळकर यांनी सोमवारी स्वीकारला. त्यानिमित्ताने महापालिकेतील माध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तेव्हा उल्हासनगरमध्ये केलेल्या कामांचा धडाकाही मांडला. लोकांमध्ये मिसळून काम केल्याने नेमक्‍या अडचणी कळतात. ज्यामुळे काम करताना फारशा अडचणी येत नसल्याचेही ते म्हणाले.

उल्हासनगर येथील येथील नगरसेवकांची मनमानी रोखण्याबरोबरच त्यांनी मांडलेले प्रकल्प, त्याकरिताचा निधी आणि अंमलबजावणी याकडे अधिक लक्ष दिल्याचा फायदा झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. निंबाळकर यांच्या उल्हासनगर महापालिकेत घेतलेल्या अनेक निर्णयांना अनेकदा राजकीय विरोध झाला. त्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले. 

निंबाळकर म्हणाले, ""अर्थसंकल्पाची अंमलबाजावणी वर्षाच्या शेवटच्या चार महिन्यांपासून होत असल्याने त्याचा परिणाम जाणवत नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासून त्यावर काम झाले पाहिजे. प्रशासकीय कामकाज गतीमान करताना त्यात शिस्तही महत्त्वाचे असते. येथे माझ्याकडील खात्यांची जबाबदारी अद्याप निश्‍चित झालेली नाही. पण, सर्व कामांवर बारकाईने लक्ष राहणार आहे. सर्व बाबी जाणून निर्णय घेतले जातील. विकामकामे करताना संबंध शहराचा विचार मांडला जाईल. त्यातूनच प्रकल्पांची उभारणी होईल.''  
 
संबंधित लेख