नागवडे अजितदादांना म्हणाले, आमच्याही पाठीवर हात ठेवून पहा!

आम्ही कधीच आपल्या शब्दाबाहेर नाही व नव्हतो.
नागवडे अजितदादांना म्हणाले, आमच्याही पाठीवर हात ठेवून पहा!

श्रीगोंदे (नगर) : आम्ही कधीच आपल्या शब्दाबाहेर नाही व नव्हतो. उद्याही आपलाच शब्द अंतीम राहिल मात्र कायम त्याग करायला लावू नका, आमच्याही पाठीवर हात ठेवून पहा कुठेही कमी पडणार नाही, असे सांगत काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे श्रीगोंद्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी घातली.

आज काष्टी (ता. श्रीगोंदे) येथे एका खासगी कार्यक्रमासाठी पवार आले होते. व्यासपिठावर आमदार राहूल जगताप, शिरुरचे माजी आमदार अशोक पवार, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार, भाजपचे बाबासाहेब भोस, काँग्रेसचे दिपक नागवडे, कैलास पाचपुते, जेष्ठनेते शिवरामअण्णा पाचपुते उपस्थितीत होते.

या वेळी बोलताना नागवडे म्हणाले, पवार कुटूंबियांनी तालुक्याच्या विकासाला कायम मदत केली आहे. त्यांचा तालुक्याला मोठा आधार आहे. जेष्ठनेते शिवाजीराव बापु नागवडे यांच्या निधनानंतर पवार कुटूंबियांनी आम्हाला सावरण्यासाठी पाठबळ दिले. त्यांच्या शब्दात आम्ही कायमच राहिलो आहोत. यापुर्वीही त्यांनी टाकलेला शब्द आम्ही जसा अंतीम मानला, तसाच आगामी काळातही राहिल. मात्र आम्ही कायमच त्यागाची भुमिका घेतली आहे. आता आपण ( पवारांनी) आमच्या पाठीवर हात ठेवला, तर आम्हीही कशातच कमी पडणार नाही, असे सांगत श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर उमेदवारीचा हक्क सांगितला.

याच कार्यक्रमाचे अध्यक्ष असणाऱ्या आमदार राहूल जगताप यांनीही याच मुद्याला स्पर्श करीत, व्यासपिठावर सगळेच समविचारी नेते एकत्र आहेत. अजितदादा व पवारसाहेब पाठीशी असल्याने भविष्यात श्रीगोंद्यातील काळजी करण्यासाठी सारखी स्थिती नाही. आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस आघाडीचा जो  नेते देतील तो पाहून आम्ही सर्वाधिक मताधिक्य देवू. विधानसभेलाही पवार हेच अंतीम राहतील. त्यांचाच आदेश आमच्यासह तालुक्यातील सर्वांसाठी अंतीम राहिल.

अजित दादांनी मात्र या विषयाला पध्दतशीर बगल देत राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रहार करीत हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com