पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित ; उद्धव ठाकरे यांची घोषणा

पालघर लोकसभेची जागा कोण लढणार याचे अखेर मिटला असून दोन दिवसापासून चर्चेत असलेले भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे जाहीर केले. राजेंद्र गावित यांनी आज 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. श्रीनिवास वनगाही यावेळी हजर होते. वनगा यांना विधीमंडळात पाठविण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे.
पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित ; उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : पालघर लोकसभेची जागा कोण लढणार याचे अखेर मिटला असून दोन दिवसापासून चर्चेत असलेले भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे जाहीर केले. राजेंद्र गावित यांनी आज 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. श्रीनिवास वनगाही यावेळी हजर होते. वनगा यांना विधीमंडळात पाठविण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे.

याविषयी ठाकरे म्हणाले, "श्रीनिवासला संसदेत पाठवायचे आहे हा शब्द मला लक्षात आहे. श्रीनिवासला विधीमंडळात कसे पाठवायचं ते मी बघेन, तो माझा शब्द आहे. त्यानंतर मी त्याला लोकसभेसाठी पाठवेन. युती झाली आहे, गावित चांगले काम करत आहेत. युती अधिक घट्ट होईल. ''मी स्वत: निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार बनून भविष्यात काम करण्याचा विचार आहे,'' असे श्रीनिवास वनगा यांनी यावेळी सांगितले.

ठाकरे पुढे म्हणाले, " पालघर लोकसभा मतदारसंघ हा जागावाटपात शिवसेनेकडे आहे, गेल्या पोटनिवडणुकीत मी जाहीरपणे सांगितले होते की मला श्रीनिवासला संसदेत पाठवायचे होते, तो माझा शब्द आजही कायम आहे, मात्र या दरम्यानच्या काळात श्रीनिवासनी  सुद्धा मतदार संघाचा आढावा घेतला आहे.  श्रीनिवास तिथे काम करतो आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनिवासला असे वाटले की त्याला अजून तिथे काम केले पाहिजे, आधी मी विधिमंडळात काम करतो मग पुढे कसे ते ठरवू , असे त्याने सांगितले. माझा त्याला दिलेला शब्द आहे तो आहेच. आता श्रीनिवासला विधिमंडळात काम करण्याची इच्छा  असेल तर मी त्याला कोणत्याही मार्गाने विधिमंडळात पाठवल्याशिवाय राहणार नाही.''

''आजही माझ्या मनावर दडपण आहे, कारण बाळासाहेब नेहमी सांगायचे की एखाद्याला शब्द देताना विचार करून दे. एकदा शब्द दिला की तो पाळलाच पाहिजे, हीच आमच्या कुटुंबीयांची शिवसेनेची ओळख आहे. पालघर मतदार संघात खासदार म्हणून राजेंद्र गावित यांनी काम केलेले आहे, आठ-दहा महिन्यांचा  त्यांचा अनुभव आहे, आमची युती झाल्यामुळे या मतदार संघात इतर कोणी घेण्यापेक्षा मी गावित यांनाच शिवसेनेत घेऊन पालघर लोकसभेचे तिकीट देत आहे. अशी युती जगात एखादीच असेल ज्यात जागाही घ्या आणि उमेदवारही घ्या इतके एकमत होत असेल. त्यामुळे पालघर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांची उमेदवारी शिवसेनेतर्फे मी जाहीर करत आहे.
साताऱ्यातून नरेंद्र पाटील यांचीही उमेदवारी मी जाहीर केली आहे, शिवसेनेच्या आता सर्व २३ उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली आहे." असेही ठाकरे म्हणाले.

पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा आणि भाजपच्या राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत झाली होती. यात राजेंद्र गावित यांचा विजय झाला होता.  शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेकडे आल्याने या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन खल सुरु होता. अखेर राजेंद्र गावितांना शिवसेनेकडून तिकीट देण्याचा निर्णय झाला. दुसरीकडे लोकसभेच्या तिकीटासाठी इच्छुक असलेले श्रीनिवास वनगा यांची आमदारकीवर बोळवण करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com