rajeev satav mp congress | Sarkarnama

आजचा वाढदिवस : राजीव सातव, खासदार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कॉंग्रेसचे युवा नेतृत्व आणि मराठवाड्यातील हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचा पंचायत समितीचे सदस्य ते लोकसभा सदस्य असा प्रवास आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, सरचिटणीस, पक्षनिरीक्षक, प्रवक्ता असे पक्षाच्या पातळीवरही त्यांचे काम सुरू आहे. पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सभापती त्यानंतर कळमनुरीचे आमदार आणि त्यानंतर लोकसभेचे खासदार अशी त्यांची वाटचाल आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर माजी मंत्री व ज्येष्ठ नेत्या रजनीताई सातव यांचे ते चिरंजीव आहेत.

कॉंग्रेसचे युवा नेतृत्व आणि मराठवाड्यातील हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचा पंचायत समितीचे सदस्य ते लोकसभा सदस्य असा प्रवास आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, सरचिटणीस, पक्षनिरीक्षक, प्रवक्ता असे पक्षाच्या पातळीवरही त्यांचे काम सुरू आहे. पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सभापती त्यानंतर कळमनुरीचे आमदार आणि त्यानंतर लोकसभेचे खासदार अशी त्यांची वाटचाल आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर माजी मंत्री व ज्येष्ठ नेत्या रजनीताई सातव यांचे ते चिरंजीव आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेसचे दोनच खासदार असून त्यामध्ये ते आणि अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. ऍड. सातव हे युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी देशभर भ्रमण करून युवकांचे संघटन तयार केले होते. आताही खासदार म्हणून काम करत असताना मागील तीन वर्षातील त्यांची सभागृहातील सरासरी उपस्थिती नव्वद टक्के आहे. 

संबंधित लेख