रामराजेंविषयी कोणीही ब्र काढल्यास जशास तसे उत्तर देणार - विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर

रामराजेंविषयी कोणीही ब्र काढल्यास जशास तसे उत्तर देणार - विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर

फलटण : ""खासदार उदयनराजे भोसले यांनी विकासाच्या मुद्द्यावर आरोप करावेत. रामराजेंनी विकासाचे राजकारण नेहमीच केले आहे. त्यांच्यावर वैयक्तिक टीका करून शिंतोडे उडवू नका. आगामी काळात रामराजेंविषयी कोणीही ब्र शब्द काढल्यास त्यास आमच्या शैलीत उत्तर देऊ. अरेला कारे करायला आम्ही घाबरत नाही. कोणी अंगावर आला, तर त्याला शिंगावर घ्यायची धमक आमच्यात आहे, असा इशारा फलटण पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक- निंबाळकर यांनी दिला. 

खासदार उदयनराजे यांनी शनिवारी फलटणला येऊन रामराजेंवर केलेल्या टिकेविषयी प्रतिक्रिया देताना विश्वजितराजे बोलत होते. विश्वजितराजे म्हणाले, ""शाळेत असल्यापासून आपले व खासदार उदयनराजेंचे संबंध आहेत. शाळेत त्यांच्याविषयी कोणी बोलले, तर त्याला मारायलाही आपण कमी पडत नव्हतो. उदयनराजे यांचे आपण खूप मोठा फॅन होतो. मात्र, काल फलटणला येऊन माझ्याच काकांवर केलेल्या टीकेमुळे त्यांच्याविषयी तिरस्काराची भावना मनात तयार होत आहे. रामराजे यांनी विकासाचे राजकारण केले आहे. खंडाळा, फलटण तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतीचे काम असो किंवा फलटणच्या दुष्काळी भागाला पाणी पोचवण्याचे काम असो, ते रामराजे यांनी काम केले आहे. आज उदयनराजेंकडे विकासाचा कोणताही मुद्दा बोलायला नसल्याने वैयक्तिक आरोप करीत आहेत. आगामी काळात रामराजेंविषयी कोणीही ब्र शब्द काढल्यास त्यास आमच्या शैलीत उत्तर देऊ.'' अरेला कारे करायला आम्ही घाबरत नाही. कोणी अंगावर आला, तर त्याला शिंगावर घ्यायची धमक आमच्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com