raje in satara | Sarkarnama

साताऱ्यात मॅरेथॉनच्या उद्‌घाटनाला दोन्ही राजांचा अबोलाच

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 सप्टेंबर 2018

सातारा : पीएनबी मेटालाइफ सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या उद्‌घाटन कार्यक्रमात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. पण दोघांनीही अबोला धरत एकमेकांबाबत पाहण्याचेही टाळले. तालीमसंघाच्या मैदानावरून उदयनराजेंच्या हस्ते झेंडा दाखवून हिल मॅरेथॉनची सुरवात झाली. 

पीएनबी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. तालीम संघाच्या मैदानावर उभारलेल्या व्यासपीठावर सकाळी सहाच्या सुमारास 
स्पर्धेचे उद्‌घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, तसेच हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजक व पीएनबीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

आनेवाडी टोलनाक्‍याच्या वादापासून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. दोघांकडून एकमेकांना आव्हान देण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिल हाफ मॅरेथॉनच्या उद्‌घाटन कार्यक्रमास दोघांनाही निमंत्रित केले होते. यावेळी व्यासपीठावर दोघेही एकमेकांच्या शेजारी उपस्थित होते. पण दोघांनीही एकमेकांकडे पाहण्याचेही टाळून अबोल राहणे पसंत केले. त्यानंतर खासदार उदयनराजेंच्या हस्ते स्पर्धकांना झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ झाला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले शांतपणे एका बाजूला उभे होते. 

संबंधित लेख