rajasthan cm and election | Sarkarnama

राजस्थानमध्ये भाजप सत्ता गमावण्याची शक्‍यता

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे : राजस्थानमध्ये भाजप सरकार सत्ता गमवण्याची चिन्ह एक्‍झिट पोलद्वारे दिसून आले आहे. आजतक एक्‍सिस, टाईम्स नाऊ आणि रिपब्लिक या तीन संस्थांनी घेतलेल्या एक्‍झिट पोलच्या मते भाजपला तिथे सत्ता गमवावी लागणार आहे. 

टाईम्स नाऊ - सीएनएक्‍स या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या एक्‍झिट पोलनुसार भारतीय जनता पक्षाला 85 जागा मिळतील तर कॉंग्रेसला 105 जागा मिळतील या पोलनुसार अन्य पक्षांना 9 जागा मिळतील. रिपब्लिक संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या एक्‍झिट पोलनुसार या राज्यातील लढत अटीतटीची राहणार आहे. त्यांच्या मते इथे भाजपला 93 तर कॉंग्रेसला 91 जागा व अन्य पक्षांना 16 जागा मिळतील. आजतक एक्‍सिस या संस्थेच्या एक्‍झिट पोलनुसार भाजपला मोठा धक्का बसणार असून भाजपला 63 जागा मिळणार आहे तर कॉंग्रेसला 130 जागा मिळतील. 

संबंधित लेख