rajastan election analycis | Sarkarnama

राजस्थानात भाजपचे बालेकिल्ले असंतोषामुळे धोक्‍यात 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

जयपूर : राजस्थानात सरकारविरोधी लाटेचा सामना करीत असलेल्या सत्तारूढ भाजपसमोरच्या अडचणी वाढत आहेत. पक्षाचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यांतही विविध कारणांमुळे असंतोष असल्यामुळे उमेदवारांची नावे निश्‍चित करणेही अवघड झाले आहे. अलवर, अजमेर, जयपूर आणि कोटा हे जिल्हे भाजपचे गड मानले जातात. 

राज्यात गेल्या वेळच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा होऊन भाजपला 200 पैकी 163 जागा मिळाल्या होत्या. मात्र, कोणतीही लाट नसली, तरी जयपूर, अलवर, अजमेर आणि कोटा हे जिल्हे भाजपला अनुकूल असतात. एखादी लाट असेल, तर सगळ्याच जागांवर विजय आणि नसली, तरी मोठ्या प्रमाणात विजय, असे या जिल्ह्यांबाबत भाजपचे गणित आहे. 

2008 मध्ये कोणतीही लाट नसताना कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले होते. पण, तेव्हाही जयपूर जिल्ह्यातील 10 पैकी दहा, अलवरमधील 11 पैकी आठ आणि कोटातील सहापैकी तीन जागा भाजपने जिंकल्या होत्या. प्रभाव नसलेल्या जोधपूर, नागौर, भरतपूर आणि धौलपूर या जिल्ह्यांतही भाजपची कामगिरी चांगली झाली होती. हे जिल्हे कॉंग्रेसला अनुकूल मानले जातात. मात्र, यंदा अंतर्गत गटबाजीने भाजपच्या प्रभावक्षेत्राला ग्रासले असल्यामुळे उमेदवारांची यादी अद्याप प्रसिद्ध होऊ शकली नाही

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख