नगरसेविका राजश्री काळेंना पालिकेत अश्रू अनावर

नगरसेविका राजश्री काळेंना पालिकेत अश्रू अनावर

पुणे : पुण्यात शहरभर अतिक्रमणे थाटली गेली आहेत. ती तुम्हाला दिसत नाहीत का ? मग, पारधी समाजातील कुटुंबियांच्या घरांवर हातोडा का उगारलात, अशा शब्दांत अतिरिक्त आयुक्तांना जाब विचारत, सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका राजश्री काळे यांनी महापालिकेच्या प्रशासनाची कोंडी केली. मात्र, एवढा गळा काढूनही अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आपली कैफियत ऐकून घेत नसल्याने काळेंचा कंठ दाटून आणि त्या गर्दीत ओक्‍साबोक्‍सी रडल्या. ज्या लोकांच्या घरांवर कारवाई झाली, त्यांना महापालिकेत आणून आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. 

कारवाईला विरोध नाही, परंतु, ज्यांच्या घरातील वस्तू ताब्यात घेतल्या आहेत, त्या सोडण्याची मागणी लावून धरत, काळेंनी अतिरिक्त आयुक्‍तांचे कार्यालयच डोक्‍यावर घेतले. काळेंच्या म्हणण्यानुसार या गरिबांचा संसार तो काय होता? भांडी, कपडे, दुधाची बाटील असे साहित्य जप्त करण्यात आले. ते मिळाल्याशिवाय परत जाणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. 

त्यांच्या अचानक आक्रमक पवित्र्यामुळे महापालिकेत गोंधळ उडाला. भाजपचे नगरसेवक दीपक मोटे, राहुल भंडारे यांनी मध्यस्थी करीत काळेंना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काळेंचा पवित्रा पाहून निंबाळकरांना त्यांच्या "ऍन्टी चेंबर"मध्ये नेण्यात आले. तरीही, काळे आपल्या भूमिकेवर ठाम राहून बाजू मांडत होत्या.

अतिक्रमण झालेल्या कुटुंबियांचे साहित्य देईपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे गोंधळात भर पडली. 
जंगली महाराज रस्ता आणि आजूबाजूच्या परिसरातील पदपथावर पारधी समाजातील लोकांच्या घरे आहेत. मुळात ती बेकायदा आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी दुपारी कारवाई केली. दरम्यान, तेथील साहित्यही ताब्यात घेतले. त्यामुळे या लोकांनी काळेंची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. तेव्हा आक्रमक झालेल्या काळेंनी महापालिका गाठून कारवाईचा जाब विचारला. अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप त्यांच्या कार्यालयात नसल्याने काळे निंबाळकरांच्या दालनात गेल्या. तिथे जाऊन विषय मांडला. परंतु, कारवाई योग्य असल्याचे निंबाळकरांनी सांगितले. त्यावर संतापलेल्या काळे मोठमोठ्याने बोलू लागल्या. पोटेंनी समजूत काढूनही त्या शांत झाल्या नाहीत. त्यानंतर ढसाढसा रडल्या.
 
काळे म्हणाले, ""कारवाईत ताब्यात घेतलेले साहित्य परत दिले पाहिजे. तसे म्हणणे मांडूनही आमच्या कोणी लक्ष देत नाही. बैठका असल्याचे सांगून डावलण्यात आले आहे. अतिक्रमणे पाडायची आहेत. तर सरसकट कारवाई का होत नाही.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com