rajani patil remembers atal bihari vajapeyi | Sarkarnama

अटलजींच्या पैशात बकरा मोत्यांच्या माळा मिळाल्याच नाहीत.....

दत्ता देशमुख
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

बीड : अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहार समिती सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेली. यावेळी अटलजींनी रजनी पाटील व बेगम नुर बानो या दोन्ही सदस्यांना स्वतःकडील पाचशे डॉलर देऊन स्वत:साठी दोन बकरा मोत्यांच्या दोन माळा खरेदी करुन आणायला सांगितल्या. मात्र, एवढ्या पैशांत दोन मोतीही मिळाले नाहीत . मग, या दोघींनी त्यांना तयार केलेल्या मोत्यांच्या माळा दिल्या. 

भारताच्या इतिहासात प्रथमच १९९६ मध्ये  भाजपचे सरकार अस्तित्वात आले आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. मात्र, १३ दिवसांचे अल्पजीवी सरकार विसर्जीत झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांना परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष करण्यात आले. जॉर्ज फर्नांडीस या समितीचे उपाध्यक्ष होते.

समितीमध्ये बीडच्या तत्कालिन खासदार रजनी पाटील आणि उत्तर प्रदेशातील नवाब घराण्यातील असलेल्या खासदार बेगम नुर बानो देखील होत्या. समितीने सौदी अरेबियाचा दौरा केल्यानंतर अटलजींचा अनुभव काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारीणीच्या कायम निमंत्रक सदस्या रजनी पाटील यांनी ‘सरकारनामा’ला सांगितला.

सौदी अरेबियात बकरा मोती प्रसिद्ध आहे. परंतु, हे मोती अत्यंत महाग आहेत. अटलजींना या मोत्यांच्या दोन माळा हव्या होत्या. यावेळी बैठकही आयोजित केली होती. परंतु, अटलजींनी रजनी पाटील आणि बेगम नुर बानो या दोघींना बोलावून घेतले आणि दोन माळा खरेदी करुन आणून देण्यास सांगीतले. त्यासाठी बैठकीतून दोन तासांची मुभा देऊन ‘माझ्यासाठी माळाही आणा आणि तुमचीही काही खरेदी करा’ असे सांगत खिशातून पाचशे डॉलर काढून दिले.

रजनी पाटील आणि बेगम नुर बानो बाजारात जाऊन विचारपुस करु लागल्या तर येवढ्या रकमेत दोन बकरा मोतीही मिळणे अशक्य होते. त्यांनी परत जाऊन अटलजींना सांगीतले. ‘आपने दिये रुपयों मे बकरा मोती के दोन माला तो दूर दोन मोती भी नही आते’ त्यावर अटलजी खुप हसले. त्यानंतर या दोघींनी तयार केलेल्या मोत्यांच्या दोन माळा अटलजींना दिल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख