raja dhale feleciate on 30 septeber in mumbai | Sarkarnama

ज्येष्ठ नेते, विचारवंत राजा ढाले यांचा 30 सप्टेंबर रोजी मुंबईत सत्कार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

 पुणे  : दलित पॅंथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते विचारवंत राजा ढाले यांचा येत्या दि 30 सप्टेंबररोजी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदे आयोजित करण्यात आली होती. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर ; मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे आणि राजा ढाले यांची कन्या गाथा ढाले ; हेमंत रणपिसे आदी उपस्थित होते. 

ाजा ढाले यांचा 30 सप्टेंबर रोजी 78 वा वाढदिवस आहे. त्याचे औचित्य साधून त्यांच्या कर्तृत्वाचा; नेतृत्वाचा; त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील योगदानाचा कृतज्ञ भावनेतून गौरव करावा अशी संकल्पना पुढे आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वतः पुढाकार घेऊन ढाले यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

या दिवशी दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत सत्कार सोहळा होणार आहे. स्वत: आठवले उपस्थित राहणार आहेत. 

अध्यक्षस्थानी प्रा. डॉ इंदिरा आठवले असणार आहेत. तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रचार्य बापूसाहेब माने; प्रा आशालता कांबळे; सुधाकर गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत. 

संबंधित लेख