raj thakrey visits only for two minutes | Sarkarnama

राज ठाकरेंच्या दोन मिनिटांच्या भेटीने कार्यकर्त्यांचा हिरमोड

चेतन देशमुख
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

यवतमाळ : यवतमाळ येथील मनसे कार्यकर्त्यांशी केवळ दोन मिनीटे बोलून पुढील जानेवारीत दौरा करणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केल्याने मनसे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
 

यवतमाळ : यवतमाळ येथील मनसे कार्यकर्त्यांशी केवळ दोन मिनीटे बोलून पुढील जानेवारीत दौरा करणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केल्याने मनसे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
 
राज ठाकरे गेल्या चार दिवसांपासून विदर्भात आहेत. त्यांनी आज यवतमाळ येथील दौरा केला. यावेळी अनेक मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. परंतु राज ठाकरे केवळ दोन मिनिटे बोलून निघून गेले. "निवडणुकीसाठी एक वर्ष आहे. या काळात पक्षसंघटन मजबूत करून सक्षम पर्याय तयार करणार आहे. त्यासाठी हा राज्यव्यापी दौरा आहे. वर्षाअखेरीस पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे, त्यावेळी नवीन काही तरी देणार आहे', असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

येथील वसंतराव नाईक सभागृहात आज सोमवारी (ता.22) सायंकाळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "हा दौरा जाहीर सभा किंवा कार्यकर्ता मेळावा घेण्यासाठी नाही. तशा सूचना मी केल्या होत्या. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आल्याची माहिती मला मिळाल्याने मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. यानंतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संघटन बांधणीसाठी चर्चा करणार आहे. पक्षवाढीसाठी काही बदल आवश्‍यक आहेत. निवडणुकीपूर्वी रचनात्मक बांधणी करून निवडणुकीत सक्षम पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले
 

संबंधित लेख