RAJ THAKREY RALLY IN PUNE | Sarkarnama

मनसेच्या शिष्यांना गुरूपौर्णिमेला मिळणार `राज`मंत्र

उमेश घोंगडे
गुरुवार, 26 जुलै 2018

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या पुण्यात होणारा गुरूपोर्णिमा मेळावा पक्षाच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल, असा विश्‍वास पक्षाचे नेते बाबू वागसकर व शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी गुरूवारी व्यक्त केला. "सरकारनामा फेसबूक लाईव्ह'मध्ये तो बोलत होते. राज ठाकरे यांच्या करिश्मा कायम असून युवकांमधील त्यांची लोकप्रियता उद्या दिसेलच असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गेल्या वर्ष-दीड वर्षात शहर पातळीवरील पक्ष संघटनेत झालेले बदल. नव्याने जोडली गेलेली युवकांची फळी आणि संघटनात्मक विस्तार यामुळे मनसेबद्दल लोकांचा विश्‍वास वाढला असून येत्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर येईल, असे वागसकर यांनी यावेळी सांगितले. पक्षाला वाईट दिवस आल्यानंतर जे सोडून गेले ते राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ नव्हतेच ते केवळ पोटार्थी होते. असे लोक पक्षाबाहेर जाण्याने पक्षाला फारसा फरक पडत नाही, असे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे हे पक्ष कार्यकर्त्यांना सकाळी सकाळीही भेटतात. पक्षाच्या नेत्यांबद्दल विनाकारण गैरसमज पसरविण्यात आले. राजसाहेबांच्या स्टाईलचा मोठा चाहता वर्ग महाराष्ठ्रात आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक आहेत, असाही दावा त्यांनी केला.  

गेल्या वर्षात शहर पातळीवर केलेल्या संघटनात्मक बदलाचे अनेक चांगले परिणाम दिसून येत असून कार्यकर्त्यांची एक मोठी फळी या निमित्ताने उभी राहिल्याचे शहराध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. नवे समाज घटक या काळात पक्षाशी जोडल्याचे त्यांनी सांगितले. खड्डे असो वा इंधनाची दरवाढ मनेसचा कार्यकर्ता सर्वात आधी रस्त्यावर असतो. सामान्य माणसाच्या छोट्या-मोठ्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हीच पक्षाची मोठी ताकद आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. उद्या पुण्यात गुरूपोर्णिमेनिमित्त होणाऱ्या मेळाव्यातून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेलच शिवाय पुण्यातील कार्यकर्त्यांनाही पुढच्या राजकारणाचे दिशादर्शन होईल, असे त्यांनी सांगितले. 

केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही राज ठाकरे यांचा चाहता वर्ग मोठा आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यात केलेल्या दौऱ्यात मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढविणारा आहे. यापुढील काळात जिल्ह्यातही पक्ष बांधळीसाठी भरीव काम करू, असे वागसकर यांनी सांगितले. 

संबंधित लेख