Raj Thakrey on Marathi Pride | Sarkarnama

मराठी अस्मिता ही जातींच्या पलीकडे जावी - राज ठाकरे 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई : मराठी अस्मिता जातीच्या पलीकडे जायला हवी हीच इच्छा आहे , असा संदेश राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मराठी माणसांना दिला आहे . 

मुंबई : मराठी अस्मिता जातीच्या पलीकडे जायला हवी हीच इच्छा आहे , असा संदेश राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मराठी माणसांना दिला आहे . 

राज ठाकरे यांनी फेसबुकवर नवीन व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे . त्यानिमित्त राज ठाकरे आपल्या संदेशात म्हणतात ," कालच मराठी राजभाषा दिन झाला, त्यानिमित्त मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि देशातल्या इतर भाषिक आणि प्रांतिक अस्मिता याच्यावर एक व्यंगचित्र सुचलं होतं. काल ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण आज ते इथे प्रसिद्ध करतोय. नक्की पहा आणि विचार करा. मराठी अस्मिता ही जातींच्या पलीकडे जायला हवी हीच इच्छा."

या व्यंगचित्रात तामिळ ,बंगाली ,गुजराती , पंजाबी महिलांनी  अस्मितेची भरजरी वस्त्रे पांघरली असे दाखवले आहे तर मराठी अस्मितेच्या वस्त्राला  विविध जातींची थिगळे लावलेली दाखवली आहेत . 

संबंधित लेख