Raj Thakrey greets Lata | Sarkarnama

लतादिदींना राज यांच्या अनोख्या शुभेच्छा!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पुणे : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त देशातील अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कुंचल्याच्या माध्यमातून लतादिदींचे अभिष्टचिंतन केले आहे. 

राज हे सध्या फेसबुक पेजवर ऍक्‍टिव झाले आहेत. रोज काही ना काही तरी पोस्ट ते शेअर करीत आहेत. लतादिदींचे सुरेल असे चित्र त्यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केले आहे. राज यांच्या चाहत्यांनी त्यांनी लतादिदींच्या आधीच्या वाढदिवशी काढलेले चित्रही सोशल मिडियात व्हारयल केले आहे. 

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लतादिदींना उत्तम आरोग्य चिंतीले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. "स्वर्गीय सुरांनी अवघ्या विश्‍वाला मुग्ध करणाऱ्या भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा', असे ट्विट पवार यांनी केले आहे.  
 
संबंधित लेख