'अहो आधीचे ' नालायक' बदलले तर हेही झोपच काढताहेत'- पीएनबी घोटाळ्यावर  राज ठाकरेंचे व्यंगचित्र

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांची आठवण यावी असे व्यंगचित्र मनसे नेते राज ठाकरे यांनी पीएनबी बँकेच्या घोटाळ्यावर काढले आहे .नेहेमीप्रमाणे राज ठाकरे यांनी याही व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कुंचल्याचे फटकारे ओढले आहेत .
Raj-Thakre-Bank-Of-Vishwas
Raj-Thakre-Bank-Of-Vishwas

पुणे :  सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार  आर के लक्ष्मण यांची आठवण यावी असे व्यंगचित्र मनसे नेते राज ठाकरे यांनी पीएनबी बँकेच्या घोटाळ्यावर काढले आहे . नेहेमीप्रमाणे राज ठाकरे यांनी याही व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कुंचल्याचे फटकारे ओढले आहेत . 

' बँक ऑफ विश्वास ' असे नाव असलेल्या एका इमारतीतून उद्योजक विजय मल्ल्या , नीरव मोदी बॅगाच्या  बॅगा भरून बाहेर पडत आहेत . काही जण त्यांच्या बरोबर तर काही जण बँकेच्या खिडकीतून बॅगा  घेऊन सुसाट बाहेर पडत आहेत . सुट्सबुटातील एक बँक अधिकारी त्यांना बॅगा दारात डोक्यावर वाहून आणून देत आहे .  बँक कर्मचारी झोपलेला चित्रात दिसतो आहे .

बँकेबाहेर एका बाकड्यावर पहारेकऱ्याच्या   वेशात नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली डाराडूर झोपलेले दाखवले आहेत . त्यात जेटली तर मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलेले दाखवले आहेत . तेथे बँकेच्या ठेवीदार नागरिकाला त्याची पत्नी म्हणते , " अहो ,आधीचे नालायक 'सांगितले ' म्हणून आपण वॉचमन  बदलले ! तर हेही झोपायचं काढत आहेत आणि परिस्थिती पुन्हा तीच !"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com