raj thakrey don`t know about spade | Sarkarnama

राज ठाकरे यांना फावडे कसे वापरावे माहीत नाही...

ज्ञानेश सावंत
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज एक कबुली दिली. ते म्हणाले की मी आतापर्यंत कधी सत्ताधारी म्हणून सरकारमध्ये नसल्याने मला फावडे कसे वापरायचे हे माहीत नाही. मात्र कुदळ कशी मारायची, हे माहीत आहे असे स्पष्ट केले.

अभिनेते आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या वाॅटर कप स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी त्यांनी काही पाणीदार प्रश्न विचारत आताच्या आणि आधीच्या सरकारची कोंडी केली. सिंचनात पैसा मुरला नसता तर महाराष्ट्रात पाणी प्रश्न निर्माण झाला नसत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच सरकारी अधिकारी हे पाणी फाऊंडेशनमध्ये काम करत असतात तर मग सरकारी कामांत ते का करत नाही, असाही सवाल त्यांनी विचारला.

राज ठाकरे हे भाषण संपवत असताना त्यांना जमावातून प्रश्न विचारला जाऊ लागला. हा प्रश्न होता तुम्ही पाणी फाऊंडेशनच्या कामात श्रमदानासाठी केव्हा येणार? त्यावर राज म्हणाले की नक्की श्रमदानाला येईल. मी सरकारमध्ये नसल्याने मला फावडे कसे वापरायचे माहीत नाही. त्यांच्या या कबुलीनंतर एकच हशा पिकला. 

संबंधित लेख