raj thakrey captures photo of party worker | Sarkarnama

राज यांनी स्वतःच्या मोबाईलमधूल कार्यकर्त्याचा फोटो टिपला तेव्हा....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे : मोबाईलमध्ये कॅमेरा बसविणाऱ्याचा मला जीव घ्यायचायं, असा उद्वेगजनक विधान करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज फोटोग्राफीच्या मूडमध्ये होते. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात कार्यक्रम संपवून बाहेर पडत असताना त्यांनी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना बोलावून घेतले आणि थेट त्यांचाच फोटो काढला.

राज हे क्रेझ असलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांची छबी टिपण्यासाठी किंवा त्यांच्या भेटीचा पुरावा ठेवण्यासाठी अनेक जण आपल्या खिशातील मोबाईल काढतात आणि फोटो काढतात. लोकांच्या या फोटोच्या सवयीचा राज यांनी नेहमीच्या शैलीत पुण्यातच समाचार घेतला होता. मात्र या सवयीपासून ते देखील दूर राहू शकले नाहीत.

एका कार्यक्रमासाठी राज हे रंगमंदिरात आले होते. कार्यक्रम सुरू असताना शिंदे हे पत्रकार मित्रासोबत प्रांगणात गप्पा मारत उभे होते. गाडीत बसलेल्या राज यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी अजय यांना बोलावून घेतले. काय चाललंय, असं विचारलं आणि थांब तुझा फोटा काढतो, असे सांगितले. त्यावर साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. गाडीच्या काचा खाली करून, हातातील मोबाईलने राज यांनी अजय यांची हसतमुख पोझ टिपली. त्याच वेळी गाडीच्या विरुद्ध दरवाजाच्या खिडकीतून राज यांची फोटोग्राफरची मुद्रा इतरांनी त्यांच्या मोबाईलमधून पटापट टिपली. राज स्वतः फोटो काढतात आणि इतर अनेक जण त्यांच्यावर मोबाईलचे कॅमेरे रोखतात, असे दृष्यही मग अनेकांनी कॅमेऱ्यात बद्ध केले.

राज यांच्या कृतीवर साहजिकच कार्यकर्त्यांत टाळ्या पडल्या. हा फोटो सोशल मिडियात हिट झाल्यानंतर राज समर्थकांच्या त्यावर उड्या पडल्या आणि आपल्या नेत्याचे कौतुक त्यांनी सुरू केले.

संबंधित लेख