फटाके व्हाटस अॅपवरच फोडायचे का : राज ठाकरे यांचा सवाल

शिवसेनेत फटाकेबंदीवरून दोन नेत्यांत फटाके फुटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन फटाकेविक्रीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
फटाके व्हाटस अॅपवरच फोडायचे का : राज ठाकरे यांचा सवाल

पुणे : दिवाळीत फटाकेबंदीच्या मुद्यावरून सुरू झालेल्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदू सणांवरच बंदी का, असा सवाल उपस्थित करत फटाके काय फक्त व्हॉट्स अॅपवरच फोडायचे का, अशी संतप्त प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली.

मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्रीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाके फोडण्यास पूर्ण बंदी घातली आहे. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत या विषय असेच फटाके फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे पर्य़ावरण मंत्री रामदास कदम यांनी फटाकेबंदीचे समर्थन केले. त्यामुळे राज्यात फटाकेबंदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर राज यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परिणामी शिवसेनेलाही बॅकफूटवर जावे लागण्याची शक्यता आहे.

फटाकेबंदीला आमचा विरोध आहेच, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीचा सण जसा साजरा करतात, तसा लोकांनी साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हिंदू सण साजरे करण्यावरच बंदी का येते, असा प्रश्न उपस्थित करत आता फटाके काय फक्त व्हॉट्स अपवरच फोडायचे का,  अशी कोपरखळी त्यांनी मारली आहे.

एकीकडे शिवसेनेत फटाकेबंदीवरून दोन नेत्यांत फटाके फुटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन फटाकेविक्रीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर आक्षेप घेतला. फटाक्यांवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे आणि फक्त भारतातच नाही तर जगात फटाके आहेत. त्यामुळे फटाकेविक्री बंद करु नका, अशी सूचना संजय राऊत यांनी दिली.

राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली आहे. मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शपथही देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com