राजकाकांनी पाहिली पुतण्याची सोय!

राजकाकांनी पाहिली पुतण्याची सोय!

मुंबई : ठाकरे कुटुंबात राजकीय कलह असले, तरी नव्या पिढीसाठी सोय करण्याची परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तर कटाक्षाने पाळतात.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र युवा सेनेचे प्रमुख आदित्य यांनी मुंबईत वरळी येथे सभा ठेवली असल्याने आज 22 एप्रिल रोजी त्यांनी कोणतीही सभा मुंबईत ठेवली नाही.

आदित्य ठाकरे यांची युवासेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा दादरमध्ये त्यांचे फलक लागले. या परिसरात असलेले मनसेचे फलक त्यानंतर लगेचच काढून घेण्यात आले होते. आजही राज यांनी मुद्दाम सभा घेतली नसावी, असा तर्क करण्यात येत आहे. राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राळ उडवत फिरत असताना ते शिवसेनेबद्दल काहीही बोललेले नाहीत, हे उल्लेखनीय मानले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com