Raj Thakre's Will be Camping at Nahik for Five Days | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मनसे प्रमुख राज ठाकरेंची पाच दिवस नाशिकवर स्वारी

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

मनसेच्या सत्ता काळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून निर्माण करण्यात आलेल्या प्रकल्पांना भाजपच्या सत्ताकाळात घरघर लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या दौऱ्याला महत्व दिले जात आहे. संघटनात्मक स्तरावर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. 18 ते 22 डिसेंबर दरम्यान हा दौरा होईल. कार्यकर्ते त्याच्या तयारीला लागले आहेत. 

नाशिक : शहराशी विशेष राजकीय ऋणानुबंध असलेले मनसे प्रमुख राज ठाकरेंची स्वारी आता पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहे. यावेळच्या त्यांच्या दौऱ्याचा प्रमुख उद्देश 'सीएसआर' योजनेतील सुशोभीकरणाचा बोजवारा बाहेर काढण्याचा आहे. भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता आहे. मात्र, एकही नवे काम न करता सुरु केलेल्या कामांना नख लावण्याचे काम होत असल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे राज ठाकरे भाजपच्या विकासाचा फुगा फोडणार का? याची उत्सुकता आहे. 

मनसेच्या सत्ता काळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून निर्माण करण्यात आलेल्या प्रकल्पांना भाजपच्या सत्ताकाळात घरघर लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या दौऱ्याला महत्व दिले जात आहे. संघटनात्मक स्तरावर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. 18 ते 22 डिसेंबर दरम्यान हा दौरा होईल. कार्यकर्ते त्याच्या तयारीला लागले आहेत. 

यापूर्वी शहरातील तिन्ही आमदार व महापालिकेत मनसेची सत्ता होती. त्यामुळे हे शहर पक्षासाठी बालेकिल्ला होता. मात्र, त्यानंतर हा बालेकिल्ला भाजपने काबीज केला. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर दत्तक घेतल्याच्या आवाहनाला मतदारांनी साद दिली. भाजपची सत्ता आली तरी अद्याप एकही विकासाचे काम दिसले नाही. उलट नाशिककरांना पक्षातील अंतर्गत लाथाळ्या व करवाढ सोसावी लागते आहे. 

एकीकडे विकास तर नाहीच. परंतू, दुसरीकडे सामाजिक दायित्वाच्या निधीतून मनसेने उभारलेले प्रकल्पांना देखील घरघर लागली आहे. किमान मनसेच्या कार्यकाळातील प्रकल्प तरी टिकून राहावेत, अशी अपेक्षा मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. 

संबंधित लेख