Raj Thakre enters co operative sector successfully | Sarkarnama

राज ठाकरे यांची सहकार क्षेत्रात दमदार एन्ट्री 

प्रशांत  बारसिंग 
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार आमदार सुनील राऊत, शिवसेना नगरसेवक संजय घाडी, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, प्रशांत कदम, कमलाकर नाईक, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे पुत्र उन्मेष रावते यांचा मनसेमुळे पराभव झाल्याची चर्चा आहे.

मुंबई :  मुंबई डिस्ट्रिक्‍ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत चार उमेदवार निवडून आणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार क्षेत्रात प्रवेश केला आहे. विजयी उमेदवारांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अभिनंदन केले. 

शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनेलला या निवडणुकीत खातेही उघडता आले; मात्र सहकार क्षेत्रात ताकद नसताना सर्वसामान्य मनसे कार्यकर्त्यांनी विजय मिळवला आहे. यशवंत किल्लेदार, विजय पवार, दत्तात्रय वडेर आणि हेमंत दळवी यांना राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.

राज ठाकरे यांनी सहकार क्षेत्रात अधिक जोमाने कार्यरत व्हा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. याच वेळी सहकार बोर्डातून निवडून आलेले अनिशा माजगावकर आणि श्रीधर जगताप याचेही राज यांनी कौतुक केले. राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची ताकद वाढवा, असे आवाहन या वेळी केले. 

या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार आमदार सुनील राऊत, शिवसेना नगरसेवक संजय घाडी, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, प्रशांत कदम, कमलाकर नाईक, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे पुत्र उन्मेष रावते यांचा मनसेमुळे पराभव झाल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी सहकार क्षेत्रातील विजयी उमेदवारांना अधिक काम करून मनसेची ताकद वाढवा, जनप्रवाहात लोकांच्या प्रश्‍नांना न्याय द्या, असा आदेश दिला आहे.

संबंधित लेख