raj thakre in beed | Sarkarnama

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, राज ठाकरेंचा ठोकताळा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

बीड : आपले ठोकताळे खरे ठरतात, गुजरात पॅटर्नची पाहणी केल्यानंतर आपण कौतुक करुन नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा ठोकताळा मांडला, तो खरा ठरला होता. आता त्यांचे धोरण आणि वाटचाल पाहता नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे नाही हा माझा ठोकताळा आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. 

बीड : आपले ठोकताळे खरे ठरतात, गुजरात पॅटर्नची पाहणी केल्यानंतर आपण कौतुक करुन नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा ठोकताळा मांडला, तो खरा ठरला होता. आता त्यांचे धोरण आणि वाटचाल पाहता नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे नाही हा माझा ठोकताळा आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. 

पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून शुक्रवारी बीडमध्ये आले. एक दिवसाच्या जिल्हा दौऱ्यात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, मनसे कार्यालयांचे उद्‌घाटने असे कार्यक्रम आहेत. दरम्यान, त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदींचा नोटबंदीचा निर्णय फसला आहे. नोटबंदीचा निर्णय जर चुकला तर मला चौकात उभे करून हवी ती शिक्षा द्यावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते. आता देशातील प्रत्येकाने मोदींना आमच्या चौकात कधी येता याची विचारणा करणारे पत्र लिहिली पाहिजेत असे राज ठाकरे म्हणाले. 

सर्वात अगोदर नोटाबंदी विरोधात बोलणारे आपण एकमेव नेते असल्याचे ते म्हणाले. आरबीआय मधील नोटा जमा झाल्यानंतर, नोटबंधीचा निर्णय फसली हे स्पष्ट आहे, आता मोदी कोणत्या चौकात येणार आहेत. राज ठाकरे यांनी एकत्रित निवडणुकांच्या मुद्द्यावरही मत मांडले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ घातलेले पराभव झाकण्यासाठीच असल्याचा हल्लाबोल केला. उद्या पुन्हा कोठे त्रिशंकू परिस्थिती उद्भवली तर काय करणार, पुन्हा निवडणूका घेत राहणार का? तुमचे पराभव झाकण्यासाठी देश निवडणुकीच्या रांगेत उभा करणार का असा सवाल उपस्थित केला. 

साऱ्या देशाने ईव्हीएमचे प्रताप पाहीले आहेत. ईव्हीएममुळेच भाज विजयी होत आहे. सर्व पक्ष इव्हीएमद्वारे निवडणूकीला विरोध करत असताना ईव्हीएमचाच हट्ट कशासाठी. मतदान यंत्रे सत्ताधाऱ्यांच्या हाती असतील तर निवडणूक लढवायच्या कशासाठी असेही ठाकरे म्हणाले. 

स्थानिक मनसेला बळकटी 
राज ठाकरे तीन वर्षानंतर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये चैतन्य दिसून आले. आगामी काळात मनसेला या दौऱ्याने बळकटी मिळेल असे चित्र आहे. 
 

संबंधित लेख