Raj Thakray visits Lonar Lake | Sarkarnama

राज ठाकरे रमले जगप्रसिद्ध  लोणार सरोवराच्या परिसरात !

अरूण जैन
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

दौ-यातील दगदगीतून उसंत काढत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराला गुरुवारी सकाळी भेट दिली .

बुलडाणा : दौ-यातील दगदगीतून उसंत काढत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराला गुरुवारी सकाळी भेट दिली . या सरोवराच्या जणू र्टाज ठाकरे यांना  भुरळ घातली.

बराच कालावधी ते सरोवर परिसरात होते . राज यांनी सेल्फी काढला . राज ठाकरेंना तेथे बघून अनेक पर्यटक त्यांना भेटण्यासाठी आले . अनेकांनी राज ठाकरे यांचे फोटो काढले . 

काल ता. 24 बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, बुलडाणा, चिखलीचा दौरा आटोपून सायंकाळी लोणारमध्ये दाखल झाले. कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात  फटक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.

लोणार हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात आणि कचरा येथे सोडून जातात. हा कचरा स्वच्छ करण्याचे काम "मी लोणारकर" टीम करते. या टीमची राज यांनी भेट घेतली. यावेळी लोणार सरोवराच्या विकासासाठी पुढाकार घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले. 

सरोवर परिसरातील विविध ठिकाणांचे दृश्य राज यांनी व त्यांच्या सहका-यांनी कॅमेराबद्ध केले. दररोजच्या दगदगीतून मनशांतीसाठी राज यांना लोणार दौरा निश्चितच फलदायी ठरला असेच म्हणावे लागेल.

संबंधित लेख