त्या घरात पाऊल ठेवले आणि राज ठाकरे भावुक झाले !

त्यानंतर राज ठाकरे यांनी घराचा फेरफटका घेतला. तेव्हा क्षणभर ते भावुक झाल्याचे दिसले. रविवारी राज ठाकरे यवतमाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Raj-Thakray visited his-grandfather's house in Paratwada
Raj-Thakray visited his-grandfather's house in Paratwada

अमरावती :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्या घरात पाऊल टाकले आणि क्षणभर ते भावुक झाले. कारणही तसेच होते. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे प्रबोधन ठाकरे यांनी सहा वर्षे ज्या कौलारू घरात वास्तव्य केले, त्या घरात राज ठाकरे यांनी प्रवेश केलेला होता.

प्रबोधनकार ठाकरे हे राज ठाकरे यांचे आजोबा होत. अमरावतीच्या दौऱ्यावर आलेले असताना राज ठाकरे यांनी त्या घराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. मेळघाटवरून अमरावतीकडे परतत असताना ते परतवाडा येथे थांबले. अमरावतीचे स्थानिक पदाधिकारी आणि आमदार बाळा नांदगावकर यांच्या समवेत त्यांनी परतवाडा गाठले. तेथे ज्या घरामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी वास्तव्य केले होते, ती कौलारू वास्तू अजूनही उभी आहे. 

प्रबोधनकार ठाकरे परतवाडा येथे न्यायालयात अधिकारी असताना 1926 ते 32 असे सहा वर्षे या घरात वास्तव्यास होते.     घरमालकाचे नातू मनीष उघडे यांची त्यांनी भेट घेतली. तसेच परतवाड्याचे ज्येष्ठ नागरिक अनंत पिंपरकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांना जवळून पाहिलेले होते. श्री. पिंपरकर यांनी राज ठाकरेंशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्याकडे अल्बममध्ये असलेली काही छायाचित्रे आणि वर्तमानपत्रातील कात्रणेही राज ठाकरे यांना दाखवली.

घरमालकाचे नातू मनीष उघडे यांनी या जागी स्मारक उभारावे असा विचार बोलून दाखविला. राज ठाकरे यांनी त्याला दुजोरा दिला. श्री. उघडे आणि श्री. पिंपरकर यांनी राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी घराचा फेरफटका घेतला. तेव्हा क्षणभर ते भावुक झाल्याचे दिसले. रविवारी  राज ठाकरे यवतमाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com