Raj Thakray to submit Aurangabad development Blue print | Sarkarnama

राज ठाकरे सादर करणार औरंगाबादच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट

सरकारनामा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

राज ठाकरेंचे बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. मनसे जिल्हा व शहर कार्यकारिणीतर्फे दुचाकी आणि चारचाकी वाहन रॅली काढण्यात आली होती.

औरंगाबाद :  आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूकीच्या मोर्चे बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व्हिजन 2020 घेऊन राज्याचा विविध भागात दौरे करत आहेत.

औरंगाबादेतून त्यांच्या मराठवाड्यातील दुसऱ्या टप्याला आज सुरुवात झाली. शुक्रवारी (ता.30) शहरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींसमोर 'व्हिजन औरंगाबाद' ची ब्ल्यू प्रिंट सादर करणार आहेत. 

राज ठाकरे यांचे बुधवारी (ता.29) सायंकाळी पाच वाजता औरंगाबादेत आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हॉटेल विटस्‌ येथे शहरातील मोजक्‍या व्यक्तींशी संवाद साधत शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करणार आहेत. 

जंगी स्वागत 
राज ठाकरेंचे बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. मनसे जिल्हा व शहर कार्यकारिणीतर्फे दुचाकी आणि चारचाकी वाहन रॅली काढण्यात आली होती.

गेल्या महिन्यातील मराठवाडा दौऱ्यात राज ठाकरे यांनी जिल्हा व शहर कार्यकारणीत बदल करत मोठ्या प्रमाणात नव्या नियुकत्याही केल्या होत्या. त्यामुळे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सध्या चैतन्याचे वातावरण आहे.

संबंधित लेख