मोदींचे भाषण सुरू झालं की लोक घरात टीव्ही बंद करतात : राज ठाकरे 

 मोदींचे भाषण सुरू झालं की लोक घरात टीव्ही बंद करतात : राज ठाकरे 

मुंबई  : "" मी इतकं खोट बोलणारा पंतप्रधान यापूर्वी कधीही पाहिला नाही. विकास वेडा झालाय ही घोषणा भाजपमधून आलेली आहे. तुमच्यावर विश्वास ठेवला मोदीजी पण, तुम्ही भ्रमनिरास केला. तुमचं टिव्हीवर भाषण सुरू झालं की लोक टिव्ही बंद करतात. याचा अर्थ लोक संतापलेले आहे. तुम्ही देश खड्यात नेला आहात मोदीजी ,असा घणाघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केला. 

मुंबईत एल्फिस्टन रेल्वे दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशन दरम्यान संताप मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा चर्चगेटवर पोचल्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. पुढील पंधरा दिवसात प्रत्येक रेल्वे स्टेशनवरील फेरिवाल्यांना हटवा अन्यथा आमच्या स्टाईलने आम्ही निर्णय घेऊ. त्यावेळी जे काही होईल त्याची जबाबदारी आमची नसेल असा इशाराही त्यांनी दिला. 

नरेंद्र मोदींवर आपल्या भाषणात जोरदार हल्ला चढविताना ते म्हणाले, "" घराघरात कानोसा घेतला तर मोदीजी तुम्हाला शिव्या पडताहेत. लोक हळूहळू बोलायला लागलेत हे लक्षात घ्या. एखादा पंतप्रधान किती बोलतो. त्याला काही तरी मर्यादा हव्यात की नको. रोज टीव्ही लावला की यांचीच भाषणं. टीव्ही बंद केला की रेडिओवर यांचीच "मन की बात. काय चालले आहे या देशात ? विरोधाचा आवाज आता थांबणार नाही. कोणी थांबवू शकणार नाही हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावे. देशातील निवडणूक आयोगाने त्यांच्या नादी लागू नये, सरकार बदलत आहे हे लक्षात घ्या. संपादकांनाही विनंती आहे, तुम्ही त्यांच्या विरोधातही उभे राहा. दिवस बदलणार आहेत.'' 

पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही 

तुम्हाला आवाज पोचतोय का ? पोचतोय का हा आवाज ? अशी सुरवात करून राज म्हणाले, ""मोर्चासाठी मी ट्रेनने आलो नाही कारण चेंगराचेंगरी झाली असती. म्हणून मेट्रोपासून चालत आलो. आज जे काही झालं ते सांगत आहे. पश्‍चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर तेथे उपस्थित होते, पंधरा दिवसाच्या जी रेल्वे स्टेशन आहेत. जे ब्रिज आहेत. त्या सर्व ठिकाणचे फेरिवाले उठविले पाहिजे. जर उठविले नाहीत तर सोळाव्या दिवशी माझी माणसं काम करतील. या सर्वाना काय मजाक वाटला काय ? कोणी स्फोटात मरतय ? किड्यामुंग्यासारखी माणसं देशात मरता आहेत. प्रलंबित प्रश्‍न आजही सुटत नाहीत. तुमच्या आणि कॉंग्रेसमध्ये फरक तो काय ? 

आधीच्या सरकारची परिस्थिती होतीे ती आजही आहे. सरकार बदलून काय उपयोग ? महिलांसाठी एकच गाडी निघतेय. मुंबईकरांना धाकधुक असते माझा नवरा, बाप आई परत येईल की नाही. सरकार बदलत जातात. नवे सरकार येतात पुन्हा माणसं मरतता. मोदी सरकारवर जो राग आहे त्याचे कारण हेच आहे. ज्या माणसावर विश्वास ठेवला त्यानेच जर घात केला.तर त्याचा राग येतो. काय कमी केल या माणसानी तुम्हाला. बहुमत दिलं. अच्छे दिन आले का ? पण काय उपयोग ? नितीश गडकरी म्हणतात अच्छे दिन म्हणजे घशात अडकलेलं हडूक आहे. पंधरा लाख तुमच्या खातात जमा करतो म्हणणारे मोदी आज दुसरेच काही तरी सांगत आहेत. अमित शहा म्हणतात वो तो चुनावी जुमला होता. जुन्या क्‍लिप बाहेर फिरायला लागले त्याचा त्रास आता भाजप वाल्यांना होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न होते तेच आहेत. ते सुटले नाही. ही परिस्थिी राहणार असेल तर काय उपयोग तुमचा ?'' असेही ठाकरे म्हणाले. 

कोण आहेत ते गोयल? 
कोण आहेत ते गोयल? असा सवाल करून राज म्हणाले, की सुरेश प्रभूनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढले. आता गोयलला आणलं ? कोणासाठी बुलेट ट्रेन ? पहिला बुलेट ट्रेनला विरोध मी केला. तुमचे हेतू आम्हाला कळत कळत नाही की काय ? मुंबईवर गुजरातचा डोळा आहे हे आम्हाला कळत नाही का ? मुठभर गुजरातींसाठी ही बुलेट ट्रेन आहे. तिकडे जावून कला खाण्यापेक्षा येथेही मुंबईतही तो मिळतोच की ? एक लाख दहा हजार कर्ज काढणार आणि बुलेट ट्रेन करणार ते कशासाठी ? असा संतप्त सवाल करून त्यांनी बुलेट ट्रेन कदापी होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com