Raj Thakray attend farmers rally in Mumbai | Sarkarnama

माझ्या हातात एकदा सत्ता देऊन पहा  - राज ठाकरे

सरकारनामा न्यूज ब्यूरो
रविवार, 11 मार्च 2018

मुंबई :" या सरकारच्या हातून तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत . तुम्ही माझ्याकडे वीस मागण्या केल्या आहेत . मीही तुमच्याकडे एक मागणी करतो . माझ्या  हातात एकदा सत्ता देऊन पहा," असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमय्या मैदानावर शेतकरी मोर्चात सहभागी शेतकऱ्यांसमोर  बोलताना केले .

राज ठाकरे म्हणाले , '" दुसऱ्यांच्या आंदोलनाला स्वत:चं आंदोलनं  म्हणणं मला मान्य नाही. तेव्हा मी तुमचं  दर्शन घ्यायला येथे  आलो आहे .शेतकऱ्यांनो तुमच्या आंदोलनाला माझा  आपला पूर्ण पाठिंबा आहे .  कधीही हाक द्या मी मदतीस धावून येईन .या सरकारच्या हातून तुमच्या मागण्या पूर्ण होणार  नाहीत . हे खोटे बोलणारे सरकार आहे . ते तुमच्या तोंडाला पाने पुसतील . हे सरकार तुमच्या मागण्या मान्यही करेल पण अंमलबजावणी होणार नाही . यांचेच खिसे फाटले आहेत ,हे तुम्हाला काय देणार ?"

श्री . राज ठाकरे पुढे म्हणाले ," आज तुम्ही एवढे अंतर पायी चालून आला आहेत . तुम्ही आंदोलन करा. मोर्चे काढा. पण मोर्चात चालत असताना पायातलं रक्त विसरू  नका. हे थापेबाज सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे .  तुमची किंमत  फक्त निवडणुकीपुरतीच आहे .निवडणुकीच्या वेळी मात्र हा राग विसरू नका .  तुमचा हा रागच तुमची लढाई तडीस नेईल . "

संबंधित लेख